Matheran Rain Pudhari
रायगड

Matheran Rain: माथेरानमध्ये धो धो पाऊस, २४ तासांत २३१ मि.मी. विक्रमी नोंद!

यंदाच्या हंगामात ३,८८४.८ मि.मी. पाऊस,पावसाळी पर्यटन हंगाम बहरलाय

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसात माथेरानने पुन्हा एकदा विक्रमी नोंद केली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांच्या तुलनेत मागील २४ तासांत माथेरानमध्ये सर्वाधिक २३१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हा यंदाच्या पावसाळ्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

यंदाच्या हंगामात माथेरानमध्ये २८ जूनपासून पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर ४ जुलै रोजी तब्बल ४०८ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली होती. ७ जुलै ते १४ जुलैदरम्यान पावसाने काहीशी उसंत घेतली होती.

मात्र १५ जुलैपासून पुन्हा सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम असून, विशेषतः २ ऑगस्टच्या रात्रीपासून ३ ऑगस्टच्या सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या २४ तासांत २३१ मि.मी. पावसाची नोंद झाली.

रायगड जिल्ह्यातील ३ ऑगस्ट २०२६ रोजीची तालुकानिहाय पावसाची नोंद मि.मी. प्रमाणे अलिबाग – ३, मुरुड – २१, पेण – ३४, पनवेल – ६७.४, उरण – ११, खालापूर – ४०, रोहा – २६, सुधागड – ५४, माणगाव – २२, तळा – १७, महाड – ८, पोलादपूर – ८, श्रीवर्धन – ३, म्हसळा – १३, कर्जत – ४९ आणि माथेरान – २३१ मि.मी. या आकडेवारीवरून संपूर्ण रायगड जिल्ह्यात माथेरानमध्येच सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

८११.६ मि.मी. अधिक नोंद !

यंदाच्या पावसाळ्यात ३ ऑगस्ट २०२६ पर्यंत माथेरानमध्ये एकूण ३,८८४.८ मि.मी. पाऊस झाला आहे. तुलनेत, ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही नोंद ३,०७३.२ मि.मी. इतकी होती. म्हणजेच यंदा मागील वर्षाच्या तुलनेत ८११.६ मि.मी. अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ३ ऑगस्ट रोजी केवळ १४ मि.मी. पाऊस झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT