मिलिंद कदम
Matheran Travel Alert
माथेरान : पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन दिवस नेरळ-माथेरान मिनीट्रेन बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान अद्यापही मान्सूनचा धोका टळला नसून उद्या देखील ही सेवा बंद ठेवायचा की नाही याबाबत रेल्वे विभागाचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच अवकाळी पावसाने रेल्वे मार्गात दरड कोसळली असून हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान दरी खोऱ्यातून पर्यटकाना घेवून धावणारी मिनी ट्रेन मान्सून सुरू असल्याने प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने २६ आणि २७ मे या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली होती. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास यामध्ये वाड होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.
राज्यात सध्या मान्सून सुरू झाला आहे. ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच बंड हवेचे पर्यटन स्थळ असणारे माथेरान येथे पहाटे तीन तासात १८१ मिमी पावसाची नोंद झाली असून ढगफुटी सदृश पाऊस पडत सुरू आहे. कर्जत तालुक्यातील माथेरान हे सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेले ठिकाण आहे. सर्वाधिक मोठ्या प्रमाणात येथे पाऊस कोसळतो. त्यामुळे या डोंगर भागात दरड कोसळण्याची शक्यता असते त्यातच सोमवार २६ मे रोजी मुसळधार पाऊस सुरू असून तालुक्यातील तीन नद्यांनी देखील आपले रौद्र रूप धारण केले होते.
नेरळ माथेरान असा २१ किलोमिटर मिनी ट्रेनचा हा प्रवास घाट रस्त्यातील नागमोडी वळणाचा असून नेरळ येथून माथेरान पोहचण्यासाठी ट्रेनला तीन तास लागत आहे. तसेच घाट रस्त्यात मान्सून काळात दरड कोसळण्याच्या घटना घडत असून असाच काहीसा प्रकार समोर आला होता. त्यामुळे विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन दिवसासाठी ट्रेन न चालवण्याच्या निर्णय घेण्यात आला.
सोमवार २६ मे ते २७ मे २०२५ या दोन दिवसाची मिनी ट्रेनला सुट्टी देण्यात आली. दरम्यान अद्याप ही मान-सूनचा धोका टळला नसून त्याचे सावट या माथेरान वर असल्याने मुसळधार पावसामुळे माथेरान रेल्वे घाट परिसरात ठिकठिकाणी भूस्खलन होवून दरड रेल्वे मार्गावर पडून धोका निर्माण होवू शकतो या दृष्टीने रेल्वे विभागाच्या कर्मचारी काम करीत असल्यानेच उद्या म्हणजेच २८ मे रोजी नेरळ माथेरान नेरळ सेवा बंद ठेवण्याचा हालचाली वरिष्ठ स्तरावरुन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.