Manorama Khedkar arrested
मनोरमा खेडकर अटकेत  पुढारी
रायगड

Manorama Khedkar arrested | मनोरमा खेडकर 'महाड'मध्ये नेमक्या कुठे सापडल्या? जाणून घ्या सविस्तर

पुढारी वृत्तसेवा

इलियास ढोकले

नाते: वादग्रस्त आयएएस ऑफिसर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यासह अन्य समवेत असणाऱ्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी वाडी येथील एका घरातून आज (दि.१८ जुलै) सकाळी त्यांना अटक केली, या संदर्भातील माहिती महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी बोलताना दिली आहे.

बुधवारी (दि.१७ जुलै) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हिरकणी वाडी येथील 'पार्वती निवास' या घरातून मनोरमा खेडकर व त्यांच्या समवेत असणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आज (दि.१८ जुलै) सकाळी ९ वाजता महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील माहिती पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून देण्यात आली, असे डीवायएसपी शंकर काळे यांनी सांगितले.

या संदर्भात स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.१७ जुलै) रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान मनोरमा खेडेकर या अन्य एका इसमासह पार्वती निवास या ठिकाणी राहण्यासाठी आल्या. यावेळी त्यांनी घरमालकांना सोबत असलेली व्यक्ती मुलगा असल्याची माहिती दिल्याचे घरमालकांकडून सांगण्यात आले. त्यांच्या समवेत हुंडाई कंपनीची एक गाडी देखील होती अशीही माहिती समोर आली आहे.

बुधवारी (दि.१७ जुलै) रात्री दोनच्या सुमारास पौड ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने या परिसरात भेट देऊन मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेसहा वाजता त्यांना हिरकणीवाडी येथून महाडकडे घेऊन हे पथक रवाना झाल्याचे महाड तालुका पोलीस ठाण्याशी संबंधित पौड पोलीस ठाण्याकडून या संदर्भातील माहिती अधिकृतपणे देण्यात आल्याचे डीवायएसपी शंकर काळे यांनी पुढारी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT