

पौड : पिस्तूल रोखत शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (रा.नँशनल हाऊसिंग सोसायटी, बाणेर, पुणे) यांना पौड पोलिसांनी महाडमधील एका हाँटेलमधून अटक केली असून त्यांना पोलिसांच्या पथकाने पौड पोलिस स्टेशनला हजर केली आहे. त्यांच्यावर रितसर कारवाई करून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मनोरमा खेडकर यांना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून मनोरमा खेडकर या फरार होत्या. त्यांना आज सकाळी पोलिसांनी महाड येथील एका हाँटेलमधून अटक केली आहे.
पौडचे पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक सावंत, पोलिस हवालदार राँकी देवकाते, पोलिस नाईक सिध्देश पाटील, पोलिस हवालदार तुषार भोइटे, रेश्मा साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.