तळा : तळा तालुक्यातील मांदाड पुल हे आता पर्यटकांचे आकर्षण बनत असून सहा तालुक्यांना जोडणारा पुल आहे. त्यामधे तळा, मुरूड, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव अशा या तालुक्यांना जोडणारा पुल असून या पुलामुळे तळ्यातील कुडेलेणी, तळगड कील्ला, मुरूड समुद्रकिनारा व जंजिरा किल्ला, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन समुद्रकीनारा असी ठिकाणे एका जवळच्या मार्गावरून सहजगत्या पर्यटकांना पहाता येत आहेत. त्याचबरोबर ही ठिकाणे पहात असताना हे पर्यटक मांदाड पुलावरती उतरून येथील खाडीचा व निसर्गाचा अनुभव घेऊन सायंकाळी सूर्यास्तावेळी थांबून हा आनंद घेत असतात. या ठिकाणाला आता पर्यटकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
या पुलाची लांबी अंदाजे 573.75 मीटर व पुलाची रुंदी 9.45 मीटर असून उंची 10.40 मीटर आहे.या पुलाच्या कामासाठी एकूण खर्च 1210000 लक्ष आला होता. त्यावेळच्या एवढ्या मोठ्या पुलाचे भूमिपूजन 3 मार्च 1996 मध्ये तत्कालीन सा.बा.मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर उद्घाटन 12 एप्रिल 2000 मध्ये सां.बा.मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते आ. सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी आर.सी.बॉक्स गर्डरचा 38.25 मीटरचा आर.सी.सी.बॉक्स गर्डरचा गाळा हा प्रथमच महाराष्ट्रात उपयोगी आणला होता. या पुलावरून आता एस.टी.च्या फेर्या मुरुड - म्हसळा, मुरूड - तळा, म्हसळा - तळा, अशा फेर्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
एका पुलाने सहा तालुके जोडले
मांदाड खाडीवरील पुलालाही एक इतिहास आहे. त्यावेळचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या कल्पनेतून दूरदृष्टी ठेवून जिल्ह्यात मुरूड- मांदाड- कुडे- ताम्हाणे- मजगाव- तळा- रोहा- मुरूड- म्हसळा व श्रीवर्धन-माणगाव असे सहा तालुके जवळ आले असून तळा हे मध्यवर्ती ठिकाण निर्माण झाले आहे.