

कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. यावेळी इतर मागास वर्गीय महिला नगरपरिषदेचा कारभार सांभाळणार आहे. आज नगरपरिषदेच्या प्रभागांच्या सदस्यांचे आरक्षण सोडतीने जाहीर झाले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक जणांचे मनसुबे उधळले असल्याने त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती.
रॉयल गार्डनच्या सभागृहात प्रभाग आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. प्राधिकृत तथा उप जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडतीस सुरुवात झाली. याप्रसंगी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, कार्यालयीन अधिक्षक रवींद्र लाड, बहिरम बापू आदी उपस्थित होते.
नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या 2011 चे जनगणना नुसार 29663 असून दहा प्रभागातील नऊ प्रभागात प्रत्येकी दोन सदस्य आणि प्रभाग दहा मधून तीन सदस्य पालिकेवर निवडून दिले जाणार आहेत. त्यानुसार तीन जागा अनुसूचित जाती असून त्यातील दोन जागा महिला राखीव तर अनुसूचित जमाती साठी असलेल्या एक जागेवर मागील निवडणुकीत महिला आरक्षण नसल्याने यांनिवडणुकीसाठी ती जागा महिला राखीव करण्यात आली आहे. तर सहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव असून त्यातील तीन जागा महिला राखीव आहेत.
सर्वसाधारण अकरा जागा असून त्यातील सहा जागा महिला राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातील महिला आरक्षणाची सोडतीसाठी अमायरा नदाफ, गौरी परदेशी, भावी जोगळे, समर्थ ठाकरे, प्रियांशु ढोले, ईवा सुळे . वैष्णवी देशमुख, ईशानी गुप्ता, स्वराज खंडागळे, विनयकुमार महावर या विद्या विकास मंदिरच्या तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
केतन बेलोसे यांनी प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांचा मागास प्रवर्गाबद्दल आक्षेप घेतला. मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी माहिती दिली. परंतु बेलोसे यांचे समाधान झाले नाही. याप्रसंग शरद लाड, उत्तम जाधव, उमेश गायकवाड, सुनील गोगटे, संतोष पाटील, सोमनाथ ठोंबरे, दीपक मोरे, संकेत भासे, केतन बेलोसे, अभिषेक सुर्वे, प्रदीप वायकर, दिनेश कडू, भानुदास पालकर, गणेश लाड, अजय पाल, संदीप करणूक, सोमनाथ पालकर, शरद हजारे, अनिल मोरे, किशोर कदम उपस्थित होते.