Mangaon News Pudhari
रायगड

Mangaon News: बहिणीच्या प्रियकराच्या खून; आरोपी भावाला जन्मठेपेची शिक्षा

माणगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढारी वृत्तसेवा

माणगाव: बहिणीच्या प्रियकराच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माणगाव न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. ही घटना माणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संत निरंकारी सत्संग भवनसमोर 11 ऑगस्ट 2018 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

घटनेची हकीकत अशी की, सौरभ उर्फ बेंडया हरिश्चंद्र सावंत याच्या बहिणीसमवेत विशाल उर्फ बाळू उर्फ भिम श्रीपत जुमारे याचे प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधाबाबत सौरभला समजले. त्याबाबतची विचारणा करण्यासाठी तो माणगाव येथील संत निरंकारी हॉलमध्ये आला. तेथे विशाल जुमारे हा मित्रांसोबत बसलेला होता.

यावेळी सौरभने आपल्यासोबत चाकूहीआणला होता. प्रेमसंबंधांवरुन सौरभ आणि विशाल यांच्यात बाचाबाची झाली. राग अनावर झाल्याने सौरभने विशालला मारहाणही केली. तसेच खिशातील चाकू काढून विशालच्या अंगावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद दिनेश आडीत, संकेत धनाजी आडीत, कल्पेश सदु आडित, श्रीकांत चंद्रकांत तांबट, नथूराम राजु दसवते यांनी माणगाव पोलिसात दिली. आरोपीविरूध्द भा.द.वि.सं. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. गायकवाड यांनी करुन माणगाव न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय, माणगांव-रायगड येथे झाली.

सदर खटल्यामध्ये अति. शासकीय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. प्रभावी युक्तिवाद करून उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसमधील फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकीयय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली.

सदर केसमधील आरोपीत सौरभ उर्फ बेंडया हरिश्चंद्र सावंत याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी गुरुवारी (9 एप्रिल) यास दोषी ठरवून आरोपीस भा.द.वि.क. 302 अन्वये जन्मठेप व तीन हजार रुये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सदर खटल्याचे कामकाजात पैरवी अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT