Garbage Collection System: कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुंबईकरांची होणार सुटका!

मनपा कॉम्पॅक्टरद्वारे उचलणाऱ्या 13,500 कचरापेट्या करणार खरेदी
Garbage Collection System
Garbage Collection SystemPudhari
Published on
Updated on

मुंबई: कॉम्पॅक्टरद्वारे कचरा उचलण्यासाठी विशेष आकाराच्या 120 लिटरच्या 13,500 कचरापेटी खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे कचरापेटीअभावी इतरत्र पसरणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

अपुऱ्या व तुटलेल्या कचरा पेट्यांमुळे कचरा रस्त्यावर इतरत्र पसरत आहे. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत असून मुंबईकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याबाबतच्या शेकडो तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयात रोज येत असतात. पण कचरापेटीची कमतरता असल्यामुळे तुटलेल्या कचरापेटीच्या जागी नवीन कचरा पेट्या देता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Garbage Collection System
800 Crore Fund Distribution: विरोधकांना 25 लाख; सत्ताधाऱ्यांना सव्वा दोन कोटी! 800 कोटींचे वाटप ठरले; सर्वपक्षीय गटनेते मात्र करोडपती

दरम्यान कचरा पेट्यांची कमतरता व तुटलेल्या पेट्या तातडीने बदलण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घनकचरा विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार आता 120 लिटलच्या मोठ्या कचरा पेट्या खरेदी करण्यात येणार आहेत. या कचरा पेट्या कॉम्पॅक्टरद्वारे सहज उचलणे व रिकामी करून पुन्हा त्याच जागेवर ठेवणे, शक्य होणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी साठणारा कचरा तातडीने डम्पिंग ग्राउंडपर्यंत वाहून नेण्याचा वेळ वाचणार आहे.

मनपाने सुरुवातीला 13,500 कचरा पेट्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून येणाऱ्या काळात अजून दहा हजार पेट्या खरेदी केल्या जाणार आहेत. सुमारे 2 हजार 19 रुपयाला एक कचरापेटी खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेला 2 कोटी 75 लाख 27 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.

Garbage Collection System
Navi Mumbai gram panchayat takeover: चौदा गावांचे दप्तर महापालिका घेणार ताब्यात; प्रक्रिया सुरू

कचरापेटी खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला समितीची मंजुरी मिळाल्यानंतर महिन्याभरात या कचरा पेट्या महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या गोदामात दाखल होणार आहेत. त्यानंतर मागणीनुसार या पेट्या त्या त्या विभागात पाठवण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

हॉस्पिटल, शाळांनाही पेट्यांचा पुरवठा

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल व शाळांमध्येही कचरापेटीची कमतरता भासत असून येथील कचरा साठवण्यासाठी नवीन कचरापेट्या शाळा व हॉस्पिटलला पुरवण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर या प्रमुख हॉस्पिटलसह उपनगरी हॉस्पिटलमध्ये कचरापेट्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. शाळांच्या मागणीनुसारही या पेट्या पुरवल्या जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news