Onion Potato Garlic Prices Pudhari
रायगड

Onion Potato Garlic Prices: श्रावणात भाज्यांसह कांदे, लसुन, बटाटेही महागले

पुढारी वृत्तसेवा

सुधागड: ग्रामीण भागात तसेच शहरी भागात श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आणि नागरिकांकडून मांसाहार टाळून सहकारी आहाराला प्राधान्य दिले जात असल्याने भाजीपाल्याची व कांदे बटाटे लसूण यांची मागणी वाढली आहे.

त्यातच गणेश उत्सव तोंडावर आल्याने बाजारपेठ मध्ये भाजीपाल्यांची आवक आणि लसूण कांदा बटाटा यांची मागणी वाढली आहे याचा विविध भाज्यांच्या व लसूण कांदा बटाटा या दारात वाढ झाली आहे.

लसूण कांदा बटाटा यांच्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या विविध पालेभाज्या व फळभाज्यांचे दरही वाढले श्रावण महिन्यात उपवास तसेच धार्मिक कार्यक्रमांची संख्या वाढत असल्याने बटाटा रताळे काकडी भोपळा दुधी भोपला टोमॅटो मिरची कोथिंबीर यादी भाजीपाल्याला मागणी वाढली आहे गणेश उत्सव जवळ आल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमासाठी ही भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील बाजारपेठेमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या भाज्यांच्या दरातही वाढ झाल्या दिसून येत आहे पालेभाज्या वांगी भेंडी गावर दोडका कारले शेवगा घेवडा यासारख्या भाज्यांचे दरही काही दिवसाच्या तुलनेत वाढले आहे.

पावसामुळे काही ठिकाणी भाजीपाला खराब होणे वाहतूक खर्च वाढणे आणि बाजारात आवक कमी होणे याचाही परिणाम दरावर होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे दरम्यान कांदा लसूण बटाट्य चा दरामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाचा अतिरिक्त भार पडत आहे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे दैनदिन बजेट आधीच कोळमळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT