नाते ः मागील दोन दशकांच्या काळादरम्यान महाड तालुक्यातील 134 ग्रामपंचायत मधील 170 पेक्षा जास्त गावे व वाड्यांमधून नागरिकांचे झालेले स्थलांतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता महत्त्वपूर्ण मुद्दा ठरेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
मागील पिढीमध्ये नोकरी व्यवसायासाठी मोठ्या शहरात जाण्याचा असलेला प्रघात मागील काही वर्षात कमी झाला असला तरीही महाड परिसरामध्ये औद्योगिक वसाहत येऊन देखील तालुक्याच्या अनेक गावातून तरुण वर्ग हा गाव सोडून मुंबई पुणे ठाणे सुरत बडोदा या ठिकाणी नोकरी व्यवसायासाठी जात असल्याचे दिसून आले आहे तरुण पिढी तर उच्च शिक्षण घेतल्यावर परदेशात जाण्याकडे घेत असलेला निर्णय लक्षात घेता आगामी दशकामध्ये महाड तालुक्यातील 50% पेक्षा जास्त तरुण हा गावापेक्षा गावाबाहेर जाण्याची भीती येथील सुज्ञ नागरिकांसह राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
यामुळेच शासनाने महाड ग्रामीण भागातील स्थलांतराची संख्या कमी होईल या कामी लक्ष देऊन त्या ठिकाणी रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील व स्थानिक तरुण-तरुणींना आपला गाव व परिसरामध्येच नोकरी व्यवसायाची संधी मिळेल हा विश्वास निर्माण होणे गरजेचे झाले आहे.
आदिवासी, धनगर समाज बांधव प्रतिवर्षीच विविध नैमित्तिक व्यवसाय निमित्त आपल्या गावांतून स्थलांतर करून जिल्हा बाहेर कामासाठी जातात. हा इतिहास लक्षात घेता या संबंधितांना आपल्या तालुक्यामध्येच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास गावातील स्थलांतर रोखले जाऊन आपल्या गावातच रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास देखील त्याची मदत होईल असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
शासनाच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेल्या किमान योजनांची परिपुर्तता विहित मुदतीमध्ये झाल्यास त्याचा लाभ संबंधितांना तातडीने होणे शक्य होणार आहे हे लक्षात घेऊन तसेच ग्रामीण भागातील शेती संदर्भात नागरिकांना पुन्हा एकदा परंपरागत शेती करण्याबाबत प्रवृत्त करणे कामी शासनाकडून शासकीय स्तरावर विशेष मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जावे जेणेकरून याचा परिणाम स्थलांतर रोखण्यामध्ये होईल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून तालुक्याच्या ग्रामीण भागातील होणारी वाढते स्थलांतर रोखण्या कमी विशेष प्रयत्न आगामी काळात करावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उच्च शिक्षणाकडे कल वाढतोय
मागील पिढीच्या तुलनेत चालू तरुण युवक युतीमध्ये युवतींचा अभ्यासाकडे असलेला कल व त्यांचे उच्च शिक्षणाचे असलेले प्रमाण लक्षात घेता महिलांना देखील नोकरी संदर्भातील निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवर मात करण्यात आली स्थानिक उद्योगांनी अधिक संधी महिलांकरता उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा महिला वर्गातून व्यक्त होत आहे.