

रायगड : बिबट्या आला रे या एकाच आरोळीने मंगळवारी नागावकरांची झोप उडाली. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा गावात दिवसभर बिबट्याचा वावर होता. यामुळे सारे जनजीवनच विस्कळीत झाले. आख्खा गाव भयाने ग्रासून गेला.या घटनेमुळे नागावसह अलिबाग तालुक्यातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अन्नाच्या शोधात गावामध्ये वाढणारा बिबट्यांचा वावर धोक्याचे बनले आहे.
अलिबाग तालुक्यात जंगलाचाभाग मोठा आहे.यापूर्वीथळ,वायशेत,कार्लेखिंड आदीभागात बिबट्याचा वावर दिसून आला आहे.काही वर्षापूर्वी थळ येथील आरसीएफ कंपनीच्या आवारात बिबट्याचा संचार सर्रासपणे आढळत आला आहे.मात्र आता थेट गावातच प्रवेश करण्याची घटना नागावमध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागाव,रेवदंडा याभागात मोठ्या प्रमाणात झाडी आहे.वाड्यांमुळे नारळी,पोफळीच्या बागाही विस्तारलेल्याआहेत.याभागात मोठ्या प्रमाणात शेती चालते.शेतीबरोबरच पशू व्यवसायही चालतो.मुरुड तालुक्यातील फणसाडअभयारण्यात बिबट्यांचा वावर मोठाआढळतो.त् यातील काही बिबटे मानवी वस्तीत येण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत.यातील एक बिबट्या अन्नाच्याशोधात नागावमध्येआल्याचीशक्यता वर्तवली जात आहे.यापूर्वी मुरुडमध्येही बिबट्याशिरल्याची घटना घडलेली होती.त्याचीच पुनरावृत्ती नागावमध्ये घडल्याचे बोलले जाते.
दिवसभर अलिबाग तालुक्यात बिबट्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.जोतो आपापल्या परीने अर्थ काढत होता.नागावकर मात्र दिवसभर गॅसवर होते.पोलिसांसह वनविभाग कर्मचारी पहारा देत होते.
आमच्या घराच्या शेजारील वाडीत प्रथम बिबट्या दिसला. त्याने आमच्या 2 स्थानिकांवर हल्ला केला. अलिबाग जिल्ह्याचे ठिकाण असूनदेखील वन्यजीव रक्षणार्थ आवश्यक सामुग्री उपलब नाही ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे पुण्यावरून रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. केल्यानंतरही बिबट्या सापडलेला नाही. त्यामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण आहे.
मंदार वर्तक,स्थानिक, नागाव