Ganpati Idol Makers Pudhari
रायगड

Ganpati Idol Makers: गणेशमूर्तींवर रंगसंगतीचा हात फिरवण्यात कारागीर मग्न

महाड-पोलादपुरात शेकडो वर्षांची कारागिरीची परंपरा जपण्यासाठी धडपड

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: १४ सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार असल्याने दिवस रात्र गणेशमूर्ती कारखान्यात कारागीर कार्यरत असून रंगसंगतीचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे चित्र महाडसह पोलादपूरमधील गणपती कार्यशाळामधून दिसून येत आहे.

महाड शहरातील सर्वात जुना कारखाना म्हणून जाधव यांच्या कारखानाकडे तर पोलादपूरमधील पहिला गणपती कार्यशाळा म्हणून शहरातील साबळे परिवार ११० वर्षे म्हणून ओळखले जात आहे.

आजही दोन्ही कार्यशाळा सह इतर गणेश मूर्ती कार्यशाळा सुरू असून हजारो मूर्ती घडविण्यात आल्या असून १३ सप्टेंबरपासून गणेश मूर्ती घरोघरी रवाना होणार असल्याचे कारागीर यांनी सांगितले पोलादपूर येथील स्वर्गीय विश्वास मामा साबळे यांच्यानंतर तिसरी पिढीतील दिलीप साबळे, प्रदीप साबळे परिवाराच्या चौथ्या पिडीने मूर्ती बनविण्यात स्वतःला झोकून दिले आहे.

साबळे यांच्या कारखान्यात बनविल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्ती संपूर्ण पोलादपूर तालुक्यासह प्रतापगड,महाबळेश्वर,वाडा,खेड तसेच महाडचा ग्रामीण भागात गणेशोत्सवात मागणीप्रमाणे दरवर्षी जातात.

पौराणिक कथांतील मूर्तींना जास्त मागणी

शाडूच्या मूर्ती हाताळण्यासाठी नाजूक असतात. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या मजबूत असतात त्यामुळे त्यांना ज्यास्त मागणी असते. जय मल्हार, बाहुबली, दगडूशेठ गणपती, पौराणिक कथा अशा मूर्तींना जास्त मागणी असते. यासाठी गणेश चतुर्थीच्या एक महिना अगोदर म्हणजेच श्रावण महिना निघाला का मूर्तींच्या बुकिंगला खऱ्या अर्थाने सुरवात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT