नाते : ईलयास ढोकले
तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाडू लागला आहे, दरडग्रस्त गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोणत्याही वेळी होणाऱ्या घटनेला तोंड देण्यासाठी तसेच मदतीसाठी महाडमधील १२ संघटना सज्ज आहेत. या संघटना केवल दरडग्रस्त व पावसाळ्यात मदत कार्य करत नसून यांची मदत वर्षाचे बारा महिने महाड तालुक्यासाठी सुरू असते. यंदा महाड तालुक्यात दरडग्रस्त ७२ गाव संभाव्य दरडग्रस्त असून २० गावातील ११४६ दरड ग्रस्तांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
गेली चार दिवस महाड तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने महाड तालुक्यात पूर येण्याची भीती असून दर्डी कोसळण्याची भीती कायम आहे.मागील 2 दिवस पावसाचा जोर कायम असल्याने महाड तालुक्याला वाहतुकीसाठी जोडणाऱ्या गांधारी पुलाला जवळपास काठ्यापर्यंत पाणी आल्याने या ठिकाणी वाहतूक धोकादायक स्थितीत आहे. पावसाचा जोर वाढला की महाड तालुक्यातील नागरिक आणि शहरातील नागरिकांच्या समोर २०२१ च्या महापुराची दृश्य समोर येतात.
या पुराच्या वेळी व्यापारांचा करोडो रुपयांचे नुकसान झाला होता. या पुरामध्ये अनेक कुटुंबांचे प्राण वाचवणाऱ्या आणि ज्यांचा मोठ्या प्रमाणातआर्थिक नुकसान झाला अशा कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे करणाऱ्या संघटना यावेळी देखील पुन्हा महाड मधील जणते च्या मदतीसाठी आणि होणाऱ्या घटनेला तोंड देण्यासाठी सज्ज असतात. महाड मध्ये आपदा मित्र, सिसकॅप, एडवेंचर सोल, आणि महाड साळुंखे रेस्क्यू टीम या चार रेस्क्यू टीम महाड तालुक्यासाठी वर्षाचे बारा महिने अपघात ठिकाणी मदत करत असतात त्याचप्रमाणे पावसाला सुरू झाला की तालुक्यातील होणाऱ्या दुर्घटना पूरस्थिती किंवा दरड कोसळने या संघटना सज्ज राहत असून विनामूल्य काम करत असतात.
या संघटनांचे काम लोकांना बचाव करणे,अपघात स्थळी वेळेत पोहचून बचाव कार्यात अग्रेसर असणे तसेच गरज पडल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, अन्न, पिण्याचे पाणी, औषधे व आवश्यक मदत तातडीने पोहोचविण्यासाठी या संघटना काम करत असतात तरी सुद्धा या संघटनेंना शासनापासून कोणतीच मदत पुरवली जात नाही.
या संघटना विनामूल्य नागरिकांच्या बचावासाठी अहोरात्र धावणाऱ्या संघटना आहेत.त्याचबरोबर महाड तालुक्यात रोटरी क्लब, रोटरी क्लब रायगड फोर्ट, लायन्स क्लब महाड, बशीर एम हजवानी फाउंडेशन, जमियतील उलमा महाराष्ट्र, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन या सर्व संघटना वर्षाचे बारा महिने लोकांच्या मदतीसाठी धावून जातात.
अनेक वर्ष महाडमध्ये कार्यरत असलेले रोटरी क्लब, रोटरी क्लब रायगड फोर्ट, लायन्स क्लब महाड, जमियतील उलमा महाराष्ट्र, व्यापारी असोसिएशन,डॉक्टर असोसिएशन या संघटना नेहमी अपघात ग्रस्तांना मदतीसाठी धावून जातात यामध्ये जेवण नाश्ता असो पाणी असो मेडिकल मदत असो राहण्याची सोय असो या संघटना गेली अनेक वर्ष विनामूल्य आपल्या स्वतःचा पैसा खर्च करून लोकांची मदत करत आहेत. मात्र या संघटनांचा शासनाकडून फक्त वापर करून घेण्यात आलेला आहे. अद्यापि शासनाकडून यांना आज पर्यंत कोणताच पाठबल मिळालेला नाही अशा परिस्थितीत देखील या संघटना महाड तालुक्यासाठी काम करत असून या पावसाळ्यामध्ये लोकांच्या मदतीसाठी सज्ज झाल्या आहेत.
पुन्हा पूर येण्याची भीती कायम
महाड तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे पुन्हा पूर येण्याची भीती कायम आहे. प्रशासन सज्ज झाले असले तरी बचावकार्य आणि मदतीसाठी या सर्व संघटना सज्ज झाल्या आहेत. आंबेनळी घाटात दोन मोठे अपघात झाले यामध्ये आपदा मित्र, सिसकॅप आणि एडवेंचर सोल महाड यांनी जीवाची पर्वा न करता अपघातातील मृत्य लोकांना शेकडो फूट खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी मोलाची कामगिरी केली. त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांनाही रात्री अपरात्री या संघटना धावून जातात.