Khopoli drain cleaning issue pudhari
रायगड

Khopoli drain cleaning issue: खोपोली नगरपालिकेची नालेसफाई कधी होणार? नागरिकांचा सवाल

पालिकेकडून पाहणीचा दिखावा होत असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत गोपाळे

खोपोली: शहरात पावसाळ्यात नाले-गटारे तुंबून पूरस्थिती निर्माण होवू नये याकरिता खोपोली पालिका आरोग्य व बांधकाम विभाग अंतर्गत कृती आराखडा तयार करून विविध प्रभागातील लहान-मोठी गटारे नाले, सफाईचे काम दरवर्षी हाती घेतले जाते.

मे महिना काही दिवसांनी संपणार असून पाऊस कधीही सुरू होण्याची परिस्थिती असतानाही शिलफाटा पटेल नगर भागासह शहरात ठिकठिकाणी गटार व नालेसफाईचे काम अद्माप सुरू नसल्यामुळे यंदाच्या पावसात खोपोली तुंबल्यावर लोकप्रतिनिधी धावणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारात आहेत. मात्र पटेल नगर भागात पाहणी करून नागरिकांची दिशाभूल करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतल्याची चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

शहरातील भानवज-शास्त्रीय नगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विणानगर परिसर, शिळफाटा येथील डिसी नगर आदि काही भागांमध्ये पावसाचे पाणी सखल भागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. अशा काही भागातील असलेले नाले व मोठी गटारे यातील गाळ काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम युध्दपातळीवर करणे गरजेचे आहे.

तसेच प्रत्येक प्रभागातील मुख्य गटारांमधील आडकलेला कचरा काढणे गरजेचे आहे. तसेच शिळफाटा परिसरात पटेल नगर भागात पालिकेच्या वतीने पाहणी करण्यात आली मात्र नाळेसाफाईची मोहीम न राबविल्याने येथील गटारे तुंबली असून पावसाळ्याला काही दिवसच उरले असताना पालिकेच्या कारभारावर येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षापासून एप्रिल, मे महिन्यात मुसळधार पाऊस सुरू होतो.

यंदा जरी पावसाने किरकोळ हजेरी लावली असली तरी पाऊस केव्हा ही सुरू होऊ शकतो त्यामुळे पालिकेने शहरातील नालेसफाई आणि गटारे सफाईची फक्त पाहणी नव्हे तर मोहीम युद्धपातळीवर राबवावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

खोपोली शिळफाटा परिसरातील पटेल नगर भागात सर्व धर्मीय लोक वास्तव्यात आहेत. याठिकाणी छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यामुळे सर्वसामान्य वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने येथील गटारांची सफाई करणे करून घेणे उचित ठरले. पालिकेने या भागात पाहणीचा दिखावा मागील काही दिवसांपूर्वी केली मात्र गटार नालेसफाई मात्र अद्याप न झाल्याने येथील गटारे तुंबली आहेत, त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- वशिद रजपूत, उपशहर प्रमुख, युवासेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT