खोपोली : प्रशांत गोपाळे
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे व काही शाळेवर असणारे केंद्रप्रमुख यांनी माथेरान येथे एक दिवशीय राजिप शाळा हशाची पट्टी माथेरान येथे संयुक्त शिक्षण परिषद घेण्यांत आली होती. यावेळी 80 ते 85 शिक्षक या परिषदेला उपस्थित राहण्यांची परवानगी गट शिक्षणाधिकारी यांनी दिली होती.मात्र काही शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे पारिपत्रक नसतानाही खालापूर तालुक्यातील केंद्र प्रमुख आणि शिक्षक उपस्थित राहिल्यामुळे एकच चर्चेला उधाण आले आहे.
शिक्षण परिषद ही निसर्ग रम्य वातावरण असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरान येथील रायगड जिल्हा परिषद शाळा हाशाची पट्टी या शाळेत घेण्यांत आली डोंगराळ भागात असून साधारण दोन अडीच तास प्रवास तोही पायी प्रवास करून जावे लागते.तीव्र उतार, अश्या स्वरूपाचा मार्ग असून शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.मात्र काही शिक्षक विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडवून आणी शाळेला दांडी मारून शिक्षक व केंद्रप्रमुख माथेरानचा आनंद लुटण्यासाठी गेल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
खालापूर तालुक्यातील वावर्ले व जांबरुंग केंद्रांनी ही शिक्षण परिषद आयोजित करण्यांत आली.मात्र कोणतेही निमंत्रण, नसतानाही खालापूर तालुक्यातील चार शाळांचे शिक्षक माथेरानला कार्यक्रमास गेले होते. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांची चौकशी होऊन कारवाई होणार आहे. शाळेला सुट्टी घेऊन गेले होते का? सोमवारी चौकशी करण्यांत येईल असे शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येतेे.
माथेरान राजिप शाळा हशाची पट्टी येथे संयुक्त शिक्षक परिषद ठेवण्यात आली होती. मात्र काही शिक्षकांना निमंत्रण होते की नव्हते हे तपासले जाईल किंवा ते रजा टाकून गेले होते का, शाळेला सुट्टी घेऊन गेले होते का? त्याच बरोबर केंद्र प्रमुख गेले असतील तर ठीक आहे. तसेच यापुढे प्रत्येक शिक्षकाला समस दिली जाईल आणि सोमवारी चौकशी करण्यांत येईल, त्याच बरोबर शिक्षण परिषद त्याच तालुक्यात घेण्यांत येईल.दीपा परब, गट शिक्षणााधिकारी, खालापूर