रायगड

कशेडी घाटात एसटी बस व बल्करची समोरासमोर धडक ; ९ प्रवासी जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Raigad accident | या अपघाताची माहिती समजतात कशेडी पोलीस व पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

पुढारी वृत्तसेवा

धनराज गोपाळ

पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावरील जुन्या महामार्गावर कशेडी घाटात भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर एसटी बस व बल्कर यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, चालक बाळकृष्ण सुखदेव मिंड (वय : ४१, रा. खेड) हा आपल्या ताब्यातील एसटी बस (क्रमांक एम एच ०९ एफ एल १०६७) खेड ते बोरिवली अशी जात होती. दरम्यान कशेडी घाटातील भोगाव हद्दीत कशेडी घाटात खचलेल्या रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी एसटी बस व सिमेंट वाहतूक करणारा बल्कर यांच्यात समोरासमोर धडक झाली.

या अपघातात 9 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या बसमध्ये वाहक चालकासह ३१ प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात मोठा अनर्थ टळला आहे. अपघातग्रस्त बस दरीच्या बाजूने पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पण चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अपघाताची माहिती समजतात कशेडी पोलीस व पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT