Kolhapur honeybee attack : दौलतवाडी - हळदवडे मार्गावर सातजणांवर मधमाशांचा हल्ला

जखमीवर मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
honeybee attack
honeybee attackFile Photo
Published on
Updated on

मुरगूड : दौलतवाडी ते हळववडे (ता. कागल ) मार्गावर जाणाऱ्या सात प्रवाशांवर मधमाशांनी हल्ला करीत चावा घेतला. यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. जखमींना मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत .

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुरगूड-कापशी या मुख्य मार्गावरील दौलतवाडी ते हळदवडे दरम्यान असणाऱ्या घाटात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांवर अचानकपणे मधमाशांचा हल्ला होण्याचा प्रकार रविवारी (दि.१९) सांयकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडला . ही घटना समजताच दोन्ही बाजूनी येणाऱ्या प्रवाशांना व वाहनांना थांबवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. हळदवडे येथील प्रियांका प्रविण हिरुगडे (वय ३५ ) हया स्कुटीवरून आपली मुलगी कु. वंशिका (वय १० वर्ष ) व अर्णव परशराम इंदलकर (वय ९ वर्ष ) यांना मुरगूडहून खासगी क्लासहून परत घरी घेवून येत असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात मुलांसह त्या जखमी झाल्या. या अवस्थेत ग्रामस्थांनी धाव घेत तेथे जाळ करून मध माशापासून त्यांची सुटका केली.

याचवेळी मुरगूडहून पाहुण्यांच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम करून गडहिंग्लजकडे दुचाकीने जाणाऱ्या गणपती रामचंद्र सुतार (वय ५१ ) व सौ रोहिणी गणपती सुतार वय ४५ रा दुंडगे ता गडहिंग्लज )या दाम्पत्यावरही मधमाशांनी हल्ला केला . तसेच कापशीहून मुरगूडकडे दुचाकीने जाणाऱ्या नितीन सुरेश कांबळे विय ३८ )व त्यांची पत्नी निता नितीन कांबळे ( वय ३५ रा राधानगरी ) यांनाही मधमाशा चावल्याने ते जखमी झाले. या सातही जखमीवर मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ शिवाजी घुमरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news