रायगड

पनवेल महापालिका कार्यालयात करणी सेनेच्या अध्यक्षांना मारहाण

अविनाश सुतार

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: पनवेल महापालिका कार्यालयाच्या इमारतीत घुसून काही व्यक्तींनी आज (दि.२७)  करणी  सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेगर यांना मारहाण केली. अजय सिंह सेगर यांनी पनवेल पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांची माहिती दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात आणि संविधानाविरोधात बोलल्याप्रकरणी मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.
करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेगर यांनी काही महिन्यांपूर्वी संविधान बदलण्याची गरज असल्याचे भाष्य सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. याप्रकरणी सेगर यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच पनवेलमधील भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून सेगर यांना अटक करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणानंतर आज पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात जात असताना सेगर यांना भीमसैनिक सुभाष गायकवाड आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सेगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT