PFI जिंदाबादचा मेसेज आणि सुतळी बॉम्बमुळे नवीन पनवेलमध्ये खळबळ..! | पुढारी

PFI जिंदाबादचा मेसेज आणि सुतळी बॉम्बमुळे नवीन पनवेलमध्ये खळबळ..!

पनवेल ; पुढारी वृत्‍तसेवा “PFI” जिदाबाद असा मेसेज लिहून सोबत दोन सुतळी बॉम्ब ठेवण्याच्या घटनेवरून नवीन पनवेल शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना नवीन पनवेल सेक्टर 19 नीलागण सोसायटीच्या आवारात घडली आहे. सोसायटीमधील काही फ्लॅटच्या बाहेरील भींतीवर हा मेसेज लिहिल्याचे समोर आले आहे. ही घटना सोसायटीमधील रहिवाशांनी खान्देशवर पोलिसांना कळल्यानंतर खान्देशवर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. हा मेसेज देणाऱ्या सुत्रधाराचा शोध पोलीस घेत आहे.

2022 मध्ये राष्ट्रीय यंत्रणा ( NIA ) ने देशभरासह महाराष्ट्र राज्यातील पुणे, मालेगाव आणि नवी मुबई, भिवंडीसह अन्य शहरात छापे मारून PFI संघटनेशी संलग्न असणाऱ्या जवळपास 20 व्यक्तींना ताब्यात घेतले. या व्यक्तींमध्ये पनवेल शहरातील देखील काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते. तसेच त्यांचे कार्यालय देखील बंद केले होते. या घटनेनंतर पी एफ आय संघटनेची चर्चा सुरू झाली. ही संघटना देशविरोधी कारवाईंना खतपाणी देत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावला होता. त्यामुळे ही संघटना पनवेलमध्ये देखील चर्चेत होती, मात्र शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे पीएफआय संघटना पुन्हा चर्चेत आली आहे. यामुळे नवीन पनवेल मध्ये खळबळ माजली आहे.

नवीन पनवेल मधील सेक्टर 19 मधील निलागण सोसायटीतील रहिवाशांमध्ये घरा बाहेर दरवाज्यावर ” PFI ” संघटना जिदाबाद असे मेसेज लिहल्याचे आढळून आले आहे. त्या सोबत जिवंत दोन सुतळी बॉम्ब देखील ठेवल्याचे दिसून आले आहे. 786 हा नंबर प्रत्येकाच्या घराबाहेर लिहल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती या रहिवाशीयांनी खान्देशवर पोलिसांना दिली. या नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली आणि घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत  पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, घटनेची माहिती घेऊन माहिती देऊ असे त्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button