जेएनपीए : विठ्ठल ममताबादे
जेएनपीए बंदरात एकूण 3000 कंटेनर अडकल्याची माहिती जेएनपीए च्या जनसंपर्क अधिकारी अंबिका सिंह यांनी दिली आहे. इस्राईल इराण युद्धच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागात आयात निर्यात च्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.
जेएनपीए बंदरात 3000 कंटेनर अडकल्याने त्याचा फटका व्यापारी व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसला आहे. या युद्धाचा फटका जेएनपीए च्या आर्थिक क्षेत्राला बसला आहे. सध्या अनेक कंटेनरच्या लांबच लांब रांगा जेएनपीटी मध्ये लागलेल्या दिसत आहेत.
कोणतेही वाहन, मालवाहू वाहने, अवजड वाहने, कंटेनर यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. सर्व अधिकारी कर्मचारी कर्तव्य चोख बजावत आहेत.अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी सांगीतले.
जेएनपीए मध्ये सध्या 3000 कंटेनर अडकले आहेत.कोणालाही त्रास होऊ नये यासाठी सर्व व्यवहार पारदर्शक, गतिमान करण्यावर भर दिला आहे. सर्व घडामोडी वर जेएनपीए प्रशासनाचे बारीक लक्ष आहेअंबिका सिंह, जनसंपर्क अधिकारी, जेएनपीए