पेणमधील लाखो गणेशमूर्तींची परदेशवारी लांबली pudhari photo
रायगड

Iran war impact on shipping : पेणमधील लाखो गणेशमूर्तींची परदेशवारी लांबली

जेएनपीए बंदरात शेतमालाचे कंटेनर असल्याने गणेशमूर्तींचे कंटेनर आणण्यास विलंब

पुढारी वृत्तसेवा

पेण ः कमलेश ठाकूर

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात गेले चौदा दिवसापासून युद्ध सुरू राहिल्यामुळे त्याच्या झळा भारतालाही जाणवू लागल्या आहेत. इराणने त्यांच्या समुद्र हद्दीतून जहाज मार्गे होणारा डिझेल पेट्रोल पुरवठा बंद केला आहे. एकूणच समुद्र मार्गे होणारी परदेशवारी सर्व देशातील आता बंद होण्याची वेळ आली आहे. याचा फटका पेणच्या गणेशमूर्तींनाही बसणार आहे. जेएनपीए बंदरात शेतमालाचे कंटेनर असल्याने गणेशमूर्तीचे कंटेनर आणण्यास विलंब होत आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याची परदेशवारी लांबली आहे.

पेणच्या गणेशमूर्ती परदेशात जाण्यासाठी एकमेव जेएनपीए बंदर हा मार्गे आहे. मात्र भारतातील जेएनपीए बंदरातून परदेशात जाणारा कांदा, द्राक्ष, केळी, आंबे असे निर्यातीचे हजारो कंटेनर मात्र बंदराच्या दारात अडकून पडले आहेत. ही वाहतूककोंडी दूर होण्यासाठी अजून किमान पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागू शकतो. मात्र यामुळे एप्रिल महिना उजाडल्यावर परदेशात गणपती पोहोचायला आणखीन उशिर होणार आहे. मात्र हे गणपती आता कारखान्यातून न गेल्यामुळे नवीन गणेशमूर्ती बनवायला जागा उपलब्ध नाही.

एकूणच हे कंटेनर त्या बंदर मार्गतून परत माघारी जात नाहीत तोपर्यंत दुसरे कंटेनर त्या बंदराकडे जाणार नाहीत. त्यामुळे पेणमधून लाखो गणेशमूर्ती ह्या मार्च व एप्रिल महिन्यात सागरी मार्गाने किमान दीड महिन्याचा प्रवासाची परदेशवारी करून आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड, मॉरीशस, दुबई, लंडन, अशा ठिकाणी जात असतात. यासाठी पेण ते सागरी मार्गाने त्या त्या देशात जाण्यासाठी पावसाळ्यापूर्वी ही वेळ योग्य असते.

कंटेनरमध्ये पाच हजार मूर्ती

पेणमधील मूर्ती व्यवस्थित पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये भरून तो बॉक्स ट्रक टेम्पोमधून कंटेनरमध्ये भरून शिफ्ट केला जातो. एका कंटेनरमध्ये यासाठी किमान चार ते पाच हजार मूर्ती ॲड्जस्ट केल्या जातात. आणि मग तो कंटेनर ज्या देशात पाठवायचा आहे, त्या देशाचे बुकिंग केले जाते. यात आठवडा येथेच संपतो. नंतर असा कंटेनर महिना दीड महिना प्रवास करून त्या त्या देशात जातो.

तेथील बंदरातून पुन्हा आठ दिवसांच्या बुकिंग व ओळख पटवून त्या त्या ग्राहकांच्या घरापर्यंत त्या मूर्ती पाठवल्या जातात. आणि तोपर्यंत मे-जून महिना संपत आलेला असतो. मूर्ती जहाज मार्गे सुरक्षित पाठवण्यासाठी मार्च एप्रिल महिना सागरी मार्गाने हवामानाच्या दृष्टीने सुखरूप असतो. आता तयार झालेल्या गणेशमूर्ती पाठविण्याची वेळ आलेली असताना त्या मूर्ती मात्र पेणमधील कारखान्यातच पडून आहेत. ते ही अनिश्चित काळासाठी. अशी माहिती स्थानिक मूर्तीकारांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT