मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
नवाबकालापासून मुरुड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गारंबी धरण व सवतकडा धरणामुळे योजना होत्या.परंतु मुरुडशहर पर्यटनस्थळ असल्याने मागणी वाढली म्हणून मुरुड जवळील खारआंबोली येथे मोठे धरण बांधण्यात आले आणि मुरुड शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरु झाला.गारंबी व सवतकडा धरणातील पाण्याचा वापर कमी झाला.या धरणाकडे दुर्लक्ष झाले.खरतर या धरणाचे पाणी शहराला ग्रॅविटी येते कोणतेही वीज पंप वापरावे लागत नाही.त्यामुळे पालिकेचा खर्च कमी होतो.
त्याउलट खारआंबोली धरतील पाणी मुरुडला येण्यासाठी 2 मोठे पंप वापर केले जातात. त्याचे बिल लाखात येत असल्याने पालिकेचा खर्च वाढतो म्हणून पालिकेने शासनाच्या अमृत 2.0 योजनेअतंर्गत गारंबी व सवतकडा पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्याचे ठरले आहे.या अंतर्गत धरणातील गाळ काढणे,धरणातील पाणी गळती थांबवणे व धरणातून मुरुड शहराला नवीन पाईप लाईन टाकणे हि कामे 2 वर्षेनंतर सुरु झालीत योजना उशिरा का होईना, पण झाली सुरु आता होणारे काम चांगले करून घेण्याची जबाबदारी पालिकेचे आहे.
मुरुड शहरातील जनतेला गारंबी धरतील पाण्याची चव आवडीची आहे.जांभा दगडावरून वाहून येणारे शुद्ध पाणी चवीला बिसलरी पाण्यापेक्षा चिविष्ठ लागते.पाणी पिताच समाधान मिळते अशा पाण्याला खूप दिवस मुरुडकर दुरावले होते,आता पालिकेच्या अमृत 2.0 योजनेअतंर्गत गारंबी धारण पुनर्जीवित झाल्यावर वर्षातही 8 महिने गारंबी धरणाचे शुद्ध पाणी मुरुडकरांना पिण्यासाठी मिळणार आहे.उरलेले 4 महिने खारआंबोली धरणाचा वापर होणार होता.
मुरुड गारंबी व सवतकडा धरण परिसर गर्द हिरव्या झाडीने भरलेला आहे.या परिसरात 24 तास गारवा असतो म्हणूनच याला गारंबी म्हणतात.निसर्गाने भरलेला या परिसर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. पर्यटक वनभोजनाचा गारंबी धरण परिसरात खास येतात.म्हणून गारंबीचा पर्यटक विकास होणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात गारंबी धरणातून वाहून जाणारे पाणी भुशीडॅमप्रमाणे असून त्याचा पर्यटनसाठी वापर करावा अशी मागणी अनेकवेळा झाली,परंतु पाण्याचा वापर शहरात पिण्यासाठी होत असल्याने धरणाच्या पाण्यात पर्यटकाना जाण्यास बंदी आहे.परंतु गारंबी धरणातील वाहून जाणाऱ्या पाण्यावर नागशेत व शिग्रे गावाजवळ छोटे डॅम (बंधारे) बांधण्यात आलेत याठिकाणी पाणी अडवून पर्यटकांना बसण्याची सोय करून वाहत्या पाण्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता यावा असा नियिजन बंध पर्यटन विकास होणे गरजे आहे.
मुरुड गारंबी धरणातील पाणी म्हणजे अमृत आहे,मुरुडकरांना कायम तेच पाणी पिण्यासाठी मिळावे अशी योजना राबवा.पावसाळी गारंबी धरणाच्या खाली नागशेत गाव आहे.त्या परिसरात बंधारा बांधलेला आहेच फक्त पाणी अडवून पायऱ्यांचे बांधकाम केल्यास पावसाळी बंधाऱ्यावरून पाणी वाहून त्यात पर्यटकांना आनंद घेता येणार आहे,समुद्रात वाहून जाणारे पाणी पर्यटन विकासाठी उपयोगी येईल, परिसरातील बेरोजगारांना काम मिळेल.प्रमोद भायदे, माजी पाणीबरोवठा सभापती