Readymade Modak Ganeshotsav Pudhari
रायगड

Readymade Modak Ganeshotsav: गणेशोत्सवात भाविकांकडून रेडीमेड नैवेद्याला मोठी मागणी; उकडीचे मोदकासह पुरण पोळीची विशेष विक्री

वेळेअभावी गणपती बाप्पांसाठी घरच्या घरी मोदक आणि नैवेद्य बनवणे शक्य नसल्याने रेडीमेड नैवेद्याला मागणी वाढली आहे. उकडीचे, मावा, मॅगो, चॉकलेट, अंजीर आणि ड्रायफ्रूट मोदकांसह पुरणपोळीला पसंती मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

गडब: धकाधकीच्या जिवणात व काट्यावर चाळणा-या दुनियेत वेळे अभावी गणपती बाप्पासाठी वेगवेगळे मोदक व नैवेद्याचे पदार्थ बनविणे शक्य नसल्यामुळे रेडीमेड नैवैद्याला मागणी वाढली आहे

या मध्ये उकडीचे मोदक, मावा, मॅगो, चाॅकलेट, अंजिर,ड्रायफुट मोदका सोबत पुरण पोळीला अधिक पसंती मिळत असताना दिसत आहे.

बप्पाला लागणा-या मोदकांच्या सामुग्रीच्या दरामध्ये वाढ झाली असल्याने उकडीच्या व तळलेल्या एका मोदकासाठी १५ ते २० रूपये तर पुरण पोळीला २० ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. उकडीचे तसेच तळलेले मोदकासाठीच्या सामुग्रीत वाढ झाली आहे.

नारळांचे दर वाढले असुन एका नारळांसाठी २० ते ३० रूपये मोजावे लागतात. मोदकासाठी वापरले जाणारे सुवासिक बासमती पीठ हे सध्या बाजारात ५० ते ७० रुपये किलो दराने विकले जात आहे. साजुक तुप ४३० ते ४७० रुपये किलो, साखर ३४ ते ३८ रुपये किलो, गुळ ६० ते ७० रुपये किलो, दाराने उपलब्द आहे.

बप्पाच्या नैवैद्यासाठी २१ मोदक तयार करुन नैवैद्यामध्ये विविधता वेगळे पणा असावा या साठी रेडीमेड विविध रंगातील मोदकांन तसेच विविध प्रकारचे पेढे व लाडु आदि प्रकारच्या नैवैद्याला विशेष मागणी असुन सध्या माव्याचे व चाॅकलेट, मॅगो मोदक २८० ते ३२० रूपये किलो दराने विक्री होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT