हुमनाबाडी गावातील बागडे कुटुंबानी गेल्या अनेक पिढयांपासून गणेश उत्सवाची जपलेली एक गाव एक परिवार एक गणपती ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आज ही पाळली जात आहे. Pudhari News Network
रायगड

Ek Gaav Ek Ganpati : हुमनाबाडीत ‘एक गाव, एक परिवार, एक गणपती’

Ganesh Chaturthi | बागडे कुटुंबाचा गणेशोत्सव कर्जतकरांसाठी ठरतोय आदर्श

पुढारी वृत्तसेवा

नेरळ (रायगड) : आनंद सकपाळ

कर्जत तालुक्यातील हुमनाबाडी गावातील बागडे कुटुंबानी गेल्या अनेक पिढयांपासून गणेश उत्सवाची जपलेली एक गाव एक परिवार एक गणपती ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आज ही तितकाच उत्साहाने पुढे ठेवत या कुटूंबातील 30 परिवरातील लहान थोर एकत्र येऊन यंदाचा गणपती सण हा सांस्कृतिक, पारंपारिक व भक्तीमय कार्यक्रमातून व व्यसनमुक्तीचा संदेश देत साजरा करीत असुन, हा बागडे कुटूंबातील गणपती उत्सव हा कर्जतकरांसाठी आदर्श ठरत आहे.

हुमनाबाडी गावातील बागडे कुटूंबामध्ये या पूर्वी वेगवेगळा आपल्या प्रत्येकांच्या घरांमध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल जात होती. मात्र या बागडे कुटूंबातील वयोवृध्द लोकांनी त्यावेळी एकत्र येत ही जुनी परंपरा मोडीत काढत बागडे कुटुंबातील बसवले जाणारे एकूण नऊ गणपती प्राणप्रतिष्ठा पध्दत बंद करत, एक गाव एक परिवार एक गणपती ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा सुरु केली. सन. 2004 मध्ये बागडे कुटूंबातील 30 परिवार हे एकत्र येत पांडुरंग बागडे यांच्या मंडपात सूरू करण्यात आली आहे. या परंपरेला आज 21 वर्ष पूर्ण झाली आहेत.

बागडे कुटूंबातील 30 परिवारातील काही लोक ही कामा निमित्त शहरी भागात वास्तव्यास आहेत. ते सर्व लोक हे गणपती सणा निमित्त आपल्या परिवारासह हुमगावामध्ये एकत्र येत हा गणेशाची प्राणप्रतिष्ठाण करतात, या बागडे परिवारातील लोक हे सामूहिकरीत्या गणेशाची पूजाअर्चा, सेवा ही मोठ्या भक्ती भावाने करीत आहे. य ंदा गणेशाची आरास ही बैलगाडा मैदानस्वरूपी साखरण्यात आली आहे. बागडे परिवाराचा बाप्पाला हा बैलगाडा छकडयावर विराजमान झाला आहे. या गणेश उत्सवा दरम्यान येथे बागडे परिवाराकडून भजनांच्या माध्यमातून भक्तीचा गजर तर परिवारातील महिलांकडून पारंपारिक फुगड्या आदी नृत्यांचे सादरीकरण, लहान मुलांसाठी नाटक सादरीकरण व विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या गणेश उत्सवा निमित्त बागडे परिवरातील लहान थोर हे एकत्र येत असल्याने, या प्रसंगी लहान मुलांसमोर समजामधील जुन्या वाईट परंपरा व घडणार्‍या वाईट व व्यसनाधीन गोष्टीं संदर्भात प्रबोधनापर जेष्ठ व्यक्तींकडून प्रबोधनापर सुसंवाद साधला जात आहे.

नव्या पिढीवर चांगले संस्कार

या कुटूंबातील मुलांवर चांगले संस्कार घडल असल्याने परिवारातील नविन पिढी ही व्यसन व वाईट संगती व वाईट परंपरा या पासून दूर राहाण्यास महत्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव बागडे परिवारासाठी एकात्मतेचा नातेसंबंध जपण्याचा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत परंपरा पोहोचवण्याचा दुवा ठरत आहे. बागडे कुटूंबाच्या गणपती बाप्पाची गावकरी आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र पाहावयास हुमगावा मध्ये मिळत आहे. यामुळे बागडे कुटूंबातील एक गाव एक परिवार एक गणपती ही जोपासली जाणारी गणेश उत्सवाची परंपरा ही कर्जतकरांसाठी एक आर्दश परंपरा ठरेल असे बोलणे वावगे ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT