पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने घाट चढत असताना अचानक पेट घेतला. ही घटना आज (दि.२०) दुपारी १२.५० च्या सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत घडली. यावेळी चालक प्रसंगावधान राखत बाहेर पडला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या आगीत टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचलंत का ?