नेवासा : केंद्राविरोधात काँग्रेसचे आंदोलन | पुढारी

नेवासा : केंद्राविरोधात काँग्रेसचे आंदोलन

नेवासा : पुढारी वृत्तसेवा:  केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात नेवाशात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करीत तहसीलदारांना दोन वेगवेगळी निवेदने देण्यात आली. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपा सरकारने सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी लावून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

तसेच, काँग्रेस पार्टी मुख्यालयात कार्यकर्त्यांना मारहाण करण्यासाठी पोलिस पाठविणार्‍या आणि देशात हुकूमशाही आणू पाहत असणार्‍या मोदी सरकार विरुद्ध नेवाशात आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया, राजेंद्र वाघमारे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष झावरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर भणगे, अण्णासाहेब पटारे, चंद्रशेखर कडू पाटील, युवक काँग्रेसचे देवेंद्र कडू, बाळासाहेब पवार, संजय वाघमारे उपस्थित होते.

तत्पूर्वी तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, शहराध्यक्ष रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी कार्लस साठे, शोभाताई पातारे, मुसा बागवान, संदीप मोटे, सचिन बोर्डे, शाम मोरे, मुन्ना आतार, अंजुम पटेल आदी उपस्थित होते. एकाच प्रश्नावर काँग्रेस पक्षाकडून दोन वेगवेगळी निवेदने देण्यात आल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

Back to top button