माथेरान : मिलिंद कदम
माथेरानमध्ये निवडणुक आयोगाने निवडणूक करिता ई-रिक्षाचा वापर सुरू केल्यामुळे माथेरानमधील स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांना रिक्षा अपुऱ्या पडू लागल्याने येथील रिक्षाचालकांबरोबर पर्यटकांच्या वादावादीचे प्रकार वाढू लागले आहेत. परंतु शासनाने मात्र सहा रिक्षा निवडणूक करिता वापर केल्याने हा प्रकार होत असल्याचे रिक्षा अपुऱ्या पडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये सध्या फक्त वीस इ रिक्षा सुरू आहे व मा. सर्वोच्च न्यायालयाने या रिक्षांमध्ये सहा महिन्याच्या आत मध्ये वाढ व्हावी असा आदेश जारी केला आहे परंतु त्यावरती अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही त्यामुळे सध्या फक्त वीसच रिक्षा सुरू आहे त्यातील 15 रिक्षा या शालेय विद्यार्थ्या सक्तीने वापरण्याच्या सूचना आहे तर तीन ते चार रिक्षा या सतत नादुरुस्त असतात त्यामुळे माथेरानमध्ये ई-रिक्षा टंचाई सुरू झाली आहे.
सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या सात ई-रिक्षा येथील कम्युनिटी सेंटरमध्ये धुळखात पडून आहे त्यांचा वापर सुरू केल्यास येथील स्थानिक नागरी व पर्यटकांना त्याचा थेट फायदा होणार आहे परंतु पालिका प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये असंतोष
भरारी पथक ई-रिक्षाचा वापर करीत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही ई-रीक्षा आता मिळेनासी झाली आहे, अपुऱ्या रिक्षांमुळे विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून नगरपालिकेने त्यांच्या मालकीचे सात रिक्षाही रस्त्यावर आणाव्यात या मागणीला आता जोर धरू लागला आहे.