रायगड

रायगड: रोह्यात दमदार पावसामुळे भात लावणीला वेग

दिनेश चोरगे

रोहे; पुढारी वृत्तसेवा :  रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेली दोन दिवस दमदार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यात शेतीच्या कामाला वेग आल्याचे दिसून येत आहे. आज (दि.१७) दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा झाल्याने शेतकरी धास्तावला होता. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली. दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागातील मेढा, चणेरा, यशवंतखार, घोसाळे, भालगाव, धाटाव, कोलाड, सुतारवाडी, खांब, देवकान्हे, पिंगळसई, नागोठणे आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तालुक्यात दमदार पावसाच्या हजेरीमुळे सर्वत्र शेतामध्ये उपयुक्त असा पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे भात लावणीला वेग आला असून तालुक्यात  यावर्षी ९८०० हेक्टरवर भात लागवड अपेक्षित आहे.

      हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT