Digital Arrest Cyber Fraud Pudhari
रायगड

Panvel Cyber Fraud: डिजिटल अरेस्ट करून 35 लाखांची ऑनलाईन फसवणूक; मंत्री असल्याची केली बतावणी

पोलिसांचा लोगो, कोर्टाच्या बनावट पत्रांचा केला वापर

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: डिजिटल अरेस्ट करून 35 लाख 55 हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी अनोळखी ईसमा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

मालती गर्दे ह्या खारघर, सेक्टर 3 येथे राहत असून त्यांना विशाल याचा मिनिस्टर ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे फोन आला आणि कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याचे सांगितले व पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले मात्र पोलीस ठाण्यात येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर पुन्हा फोन आला आणि व्हिडिओ कॉल करून समोरची पुरुष व्यक्ती खाकी रंगाच्या ड्रेसमध्ये होती. त्यांनी त्याचे नाव संदीप सांगून मनी लॉन्ड्रीग, अतिरेकी गतीविधी मध्ये त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले. आणि दर तीन तासांनी दोघा पती-पत्नींना सेफ्टी रिपोर्ट करण्यास सांगितले.

यासाठी एका मोबाईलवर वी आर सेफ असा मेसेज पाठवण्यास सांगितले. त्यांनी तसे मेसेज केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीला मुंबई पोलिसांचा लोगो असलेली तक्रार, बँकेचे डेबिट कार्ड, स्टेटमेंट, वांटेड यादी, सुप्रीम कोर्टाचे हेडिंग असलेल्या पत्र, ईडीचे पत्र, ईडीची पावती अशी बनावट कागदपत्रे व्हाट्सअपला पाठवली आणि त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर एकूण 35 लाख 55 हजार रुपये पाठवले.

पैसे भरल्यानंतर त्यांनी वी आर सेफ हा मेसेज पाठवला नाही आणि समोरील व्यक्तींकडून विचारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना फडवणूक झाल्याचा संशय आला आणि त्यांनी 1930 नंबरवर संपर्क केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT