‘समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड’ (एसएएमआरएक्स) मार्फत आज दिघी पोर्ट लिमिटेड (डीपीएल) सोबत भागीदारी करार केला  Pudhari
रायगड

Dighi Port Automobile : दिघी पोर्टवरुन दरवर्षी दोन लाख वाहनांची निर्यात होणार; रायगड बनणार ऑटोमोबाईल निर्यात केंद्र

एपीएसईझेड आणि मदरसन भागीदारीतून वाहन निर्यातीसाठी विशेष सुविधा उभारली जाणार

पुढारी वृत्तसेवा

Raigad Automobile Export Hub

रायगड : रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट दरवर्षी दोन लाख वाहने हाताळण्याकरिता सज्ज झाले आहे. त्याकरिता मदरसनने आपल्या संयुक्त उपक्रम कंपनी ‘समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड’ (एसएएमआरएक्स) मार्फत आज दिघी पोर्ट लिमिटेड (डीपीएल) सोबत भागीदारी करार केला आहे. डीपीएल ही अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ची उपकंपनी आहे. या करारानुसार महाराष्ट्रातील दिघी पोर्टवर वाहन निर्यातीसाठी एक विशेष सुविधा उभारली जाणार आहे.

दिघी पोर्ट बनणार ऑटोमोबाईल निर्यात केंद्र

या धोरणात्मक भागीदारीमुळे मुंबई–पुणे ऑटो बेल्टमधील वाहन उत्पादकांसाठी दिघी पोर्ट हे महत्त्वाचे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनेल. एपीएसईझेडच्या १५ महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेले दिघी पोर्टने आता ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाखाली भारताच्या वाढत्या ऑटोमोबाईल उद्योगाला पाठबळ देण्यासाठी आपली क्षमता वाढवली आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात वाहनांची निर्यात आणि आयात अधिक सुरळीत हाेवू शकणार आहे.

ऑटोमोबाईल लॉजिस्टिक्समध्ये मोठा बदल घडवून येईल

या भागीदारीबद्दल बोलताना अदानी पोर्ट्स आणि सेझचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक श्री. अश्वनी गुप्ता म्हणाले," दिघी पोर्टवरील मदरसनसोबतची ही भागीदारी भारतातील ऑटोमोबाईल लॉजिस्टिक्समध्ये मोठा बदल घडवून आणेल. एपीएसईझेडचे मजबूत पायाभूत नेटवर्क आणि मदरसनचे अनुभव एकत्र येऊन देशभरात वाहन वाहतुकीसाठी एक सुरळीत आणि मजबूत व्यवस्था तयार होईल. हे रोरो टर्मिनल केवळ व्यापार वाढवणार नाही, तर पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम करेल आणि ग्राहक व स्थानिक समुदायांना दीर्घकालीन फायदा देईल, असा विश्वास या भागीदारीबद्दल बोलताना अदानी पोर्ट्स आणि सेझचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक अश्वनी गुप्ता यांनी व्यक्त केला आहे

भारताची ऑटोमोबाईल पुरवठा साखळी आणखी मजबूत हाेणार

एपीएसईझेड सोबतची ही भागीदारी आमच्या जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक सेवांचा विस्तार करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. दिघी पोर्टवर हे रोरो टर्मिनल विकसित करून आम्ही आमच्या सेवांचा विस्तार करत आहोत आणि आमच्या ओईएम भागीदारांसाठी कार्यक्षमता वाढवणारा आणि खर्च कमी करणारा एक महत्त्वाचा सुविधा प्रकल्प उभारत आहोत. या सहकार्यामुळे भारताची ऑटोमोबाईल पुरवठा साखळी आणखी मजबूत होईल आणि ग्राहकांना थेट फायदा देईल, असे मदरसन ग्रुपचे व्हाइस चेअरमन लक्ष वामन सेहगल यांनी या निमीत्ताने म्हटले आहे.

टर्मिनलमध्ये पूर्णपणे अत्याधुनिक पायाभूत सुविधा

नवीन रोरो (रोल-ऑन/रोल-ऑफ) टर्मिनलमध्ये पूर्णपणे अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील. येथे तयार वाहनांच्या (पूर्ण झालेली वाहने) लॉजिस्टिकची सर्व कामे एकाच ठिकाणी पार पडतील, ज्यामुळे प्रमुख ऑटोमोबाईल ओईएम कंपन्यांसाठी ऑपरेशन्स अधिक सोपे होतील. एसएएमआरएक्स या टर्मिनलमध्ये गुंतवणूक करून आपली सेवा अधिक सुसंगत करणार असून ग्राहकांना ३६०-डिग्री कार्गो ट्रॅकिंग आणि पूर्ण लॉजिस्टिक सूविधा देण्यात येणार आहे.

अतिरिक्त उपलब्ध सेवा सुविधा

सिंगल-विंडो रोरो ऑपरेशन्स – यार्ड व्यवस्थापन, पीडीआय, चार्जिंग, स्टोरेज आणि जहाजावर वाहन चढवणे अशी सर्व कामे एकाच ठिकाणी, सुरळीत हाताळल्या जातात. एआय-आधारित यार्ड ऑप्टिमायझेशन – वाहनांची थांबण्याची वेळ जवळजवळ शून्य होते आणि वाहनांचे थेट ट्रॅकिंग करता येते. महाराष्ट्रातील ऑटो बेल्टसाठी सर्वात जलद वाहतूक मार्ग – NH-66 मार्गे ओईएम वाहनांची तात्काळ हलवाहलव करते. रोरो-रेडी जेट्टी (1.3 किमी) इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा– संरक्षित पाण्यामुळे वर्षभर कोणत्याही हवामानात सुरळीत कामकाज करणार. ईव्ही रेडी लॉजिस्टिक्स हब – पुढील पिढीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीसाठी सक्षम सुविधा देणार. ओईएम - इंटिग्रेटेड डॅशबोर्ड्स – लोड प्लॅनिंग आणि वाहनांच्या लाईव्ह ट्रॅकिंगसाठी सुविधा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT