जेएनपीए : उरण शहरातील विकासकामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडली असून, सत्ताधारी तसेच आजी-माजी नगरसेवकांचे उघड अपयश आता जनतेसमोर प्रकर्षाने येत आहे. भाजपाच्या दीर्घकाळच्या सत्ता - काळातही शहरातील मुलभूत गरजा अपूर्ण राहिल्याने उरणची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याची तक्रार नागरिकउघडपणे करु लागलेले आहेत.
आजही शहरात सुसज्ज हॉस्पिटल नाही, खेळाचे मैदान नाही, हिलांसाठी सुरक्षित स्वच्छतागृह नाही. अंब्युलन्स उपलब्ध नाही, वाहतूक कोंडी प्रचंड, रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य, पाणीटंचाई तीव्र, विजेचा लपंडाव सुरूच, हातगाड्या-टपऱ्यांचा अतिक्रमण अनियंत्रित अवस्थेत, तर बिल्डर लॉबीचीं खुलेआम दादागिरी या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
डंपिंग ग्राउंड नाही, ड्रेनेजची व्यवस्था कोलमडलेली, विकासकामांचे फक्त फाईलवाटप आणि नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई सुरू आहे या नेहमीच्या सबबी असा मृतवत कारभार उरणमध्ये दिसून येतो. तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल होत असूनही स्थानिक युवक रोजगारापासून वंचितचं राहिला आहे.उरणचा विकास परप्रांतीयांसाठी आणि बेरोजगारी स्थानिकांसाठी ? असा सवाल नागरिकांनी थेट प्रशासनासमोर उभा केला आहे. महिला नगराध्यक्षांच्या कार्यकाळातही महिलांसाठी एकही सुरक्षित सार्वजनिक शौचालय उभे राहू शकले नाही. तसेच वाहतूक कोंडी, टपऱ्या आणि हातगाड्यांचा विस्तार वाढतच गेला. आदेशांचे ढिगारे वाढले, पण प्रत्यक्ष कारवाई शून्य. .नागरिकांना नळाचे पाणी, विजेचा योग्य पुरवठा, स्वच्छ रस्ते आणि आरोग्यसुविधांसाठी आजही रोज चकरा माराव्या लागत आहेत.