Raigad News : नेरळ गोळीबाराच्या घटनेतील आरोपींना अटक

आरोपींचा खुनासह इतर गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात उघड
Raigad News
नेरळ गोळीबाराच्या घटनेतील आरोपींना अटक
Published on
Updated on

नेरळ : नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील नेरळ पेशवाई मार्गावरील नेरळ साई मंदीर ते दामत फाटा दरम्यान रात्रीचे सुमारास दुचाकीवरून घरी जाणाऱ्या तरूणावर मागून येणाऱ्या दुचाकीवरील दोन इसमान कडून गोळीबार घटनेची उकळ करत फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलीसांना यश आले आहे. तर या आरोपींचा खुनासह इतर गुन्ह्यात सहभाग व फरार असल्याचे व सराईत गुन्हेगार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Raigad News
Minor Girl Assault Case | अल्पवयीन युवतीवर अत्याचार, दोघांना अटक

नेरळ पेशवाई मार्ग रुम नं 1, जी विग श्री स्वामी समर्थ चाळ, ता. कर्जत येथील राहाणार सचिन अशोक भवर वय वर्ष 40 हे रेडन केमटेक प्रा.लि. कंपनी, मानकिवली एम. आय. डी.सी. बदलापुर येथे नोकरी साठी जातात, त्याप्रमाणे ते कामावरून दि.24 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीचे 9.45 वाजण्याचे सुमारास त्यांचे स्कूटी क्र.एम.एच 05/डी.क्यू/7132 वरून घरी परत येत असतान, नेरळ पेशवाई मार्गावर साई मंदिर ते दामत रेल्वे फाटक दरम्यान डंपीग ग्राउंडचे जवळील ब्रीजचे अलीकडे आले असता, त्याच्या पाठी मागून येणाऱ्या दुचाकीवरून तोंडावर कपडा बांधून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाकडून सचिन अशोक भवर यांच्यावर दोन राऊंडचा गोळीबार करून सदर दुचाकीस्वार आरोपी तेथून पळून गेल्याच्या घडलेल्या घटनेचा तपास व या घटनेतील फरार आरोपींचा शोध हा रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आचंल दलाल, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अभिजित शिवथारे, कर्जत पोलीस उपअधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे व त्यांची पोलीस टीम यांच्या माध्यमातून करत असताना व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गोळीबारातील एक आरोपी हा फिर्यादी यांच्या नेरळ स्वामी समर्थ चाळीत रहायला असल्याचे व आरोपीचे नाव अविनाश जगन्नाथ मारके असे समोर आले असता, तपासात वेग वाढवत पोलिसांनी वेळ न दवडता तीन विशेष शोध पथक तयार करून तांत्रिक आधार आणि गुप्त सूत्राद्वारे आरोपींच्या हालचाली हेरल्या असता, आरोपींचा मागवा थेट नाशिकपर्यंत लागला.

या संदर्भात नेरळ पोलिसांनी गुप्त कारवाई ठेवत सापळा रचला असता, नाशिक पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या आरोपींना वेडा घालत दोघांना आरोपींच्या मुसक्या आवळत अटक करण्यात आली आहे. सदर कार्यवाही मध्ये कर्जत पोलीस उपनिरिक्षक वर्ग व नेरळ पोलीस उपनिरिक्षक सुशील काजरोळकर, पोलीस हवालदार एरुंकर, राजेश केकान, अश्रुबा बेंद्रे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

आरोपींना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

या कार्यवाहीमध्ये मुख्य आरोपी अविनाश मारके आणि त्याला साथ देणारा मित्र दीपक कोळेकर असे दोघांना अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान मुख्य आरोपी यांच्यावर धुळे शहरासह विविध ठिकाणी 15 गंभीर गुन्हयासह संगमनेर येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे समोर आले आहे. सदर आरोपींना नेरळ पोलिसांनी पनवेल जिल्हासत्र न्यायालयामध्ये हजर केले असता, अटक आरोपींना न्यायलयाने दि. 10 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. तर गोळीबार घटनेत वापरलेली बंदूकीचा शोध व पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहे. नेरळ पोलीसांच्या या कामगिरीमुळे सर्व नागरिकांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला असून, पोलिसांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

Raigad News
Kalpana Bhagwat Case : बोगस आयएएस प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news