आ. महेंद्र दळवी यांना बदनाम करण्याचा कट pudhari photo
रायगड

Raigad News : आ. महेंद्र दळवी यांना बदनाम करण्याचा कट

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवा नेते विघ्नेश माळी यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून पैशांच्या अनेक थप्पी असलेला व्हिडीओ व्हायरल करून एवढेच नाही तर या व्हिडीओत आमदार महेंद्र दळवी यांना दाखवुन त्यांना बदनाम करण्याच्या कटकारस्थानमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा हात आहे, असा आरोप शिंदे शिवसेना जिल्हा युवा नेते विघ्नेश माळी यांनी आज शहरातील शिवसेना पक्षांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.

विघ्नेश माळी पुढे म्हणाले की, कालच आमदार महेंद्र दळवी यांनी ही मिडीयाच्या समोर येऊन सांगितले की त्या व्हिडिओमध्ये मी नसून मला बदनाम करण्याचा कट स्थान आहे. ही ‌‘एआय‌‘ च्या माध्यमातून बनवलेली क्लिप असून त्यांचा लवकरच उलगडा होईल.

जर माझ्या केलेले आरोप सिद्ध झाले तर मी तात्काळ आमदारकीचा राजीनामा देईन, असे बोलणारे आमचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे आमदार व सर्व महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे.

आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हयात व आपल्या मतदारसंघात केलेली विकासकामे ही कामे जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डोईजड होऊ लागले आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडुन ‌‘एआय‌‘च्या माध्यमातून खोटी क्लिप बनुन बदनाम करण्याचा कट रचला गेला आहे.

परंतु रचलेला कट शिवसेना पक्षांचे कार्यकर्ते हाणून पाडेल आणि सत्य महाराष्ट्राच्या जनते समोर आणु परंतु अंबादास दानवे यांनी केलेले कृत्य घृणास्पद आहे. त्यांचा आम्ही निषेध करु तेवढा कमी आहे. आता कोणाताही पद नसलेला नेता असुन आपल्या गुरुला खुष करण्यासाठी केलेले षडयंत्र सध्या विरोधी पक्षाकडे कोणते विषय अधिवेशनात नसल्याने असे खोटे प्रकार केले जात आहेत, असे माळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT