रोहे : मध्य रेल्वेला भाडे-व्यतिरिक्त अवेतीरित ( नॉन-फेअर रेव्हेन्यू ) उत्पन्नांतर्गत नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा मान लाभलेला असल्याने, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत तसेच महसुलातही वाढ होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरू करण्यात आलेला ‘रिलॅक्स झोन’ हा या उपक्रमाचा नवीन भाग आहे.
प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अत्याधुनिक ‘रिलॅक्स झोन’ सुरू केला आहे. क्विक रेस्टद्वारे व्यवस्थापित ही नवी सुविधा थकलेल्या प्रवाशांना ताजेतवाने अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली असून, यात संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या उपलब्ध आहेत, ज्या प्रवासातील थकवा, स्नायूंचा ताण आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रिलॅक्स झोनमध्ये अत्याधुनिक मसाज तंत्रज्ञान तसेच स्वच्छतायुक्त आसन व्यवस्था असून, त्यामुळे सर्व प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित अनुभव मिळतो. ही सुविधा परवडणाऱ्या दरात जलद मसाज सत्रे उपलब्ध करून देते, ज्याची सुरुवात केवळ रु.99 पासून होत असून, प्रवासाआधी किंवा प्रवासानंतर प्रवाशांसाठी आराम मिळविण्याचा हा एक पर्याय आहे.
रिलॅक्स झोन मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या असुन आरामदायी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. येथे आरोग्यदायी व स्वच्छतायुक्त वातावरण राहाणारे आहे. हि सुविधा रु. 99 पासून सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रिलॅक्स झोन हा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचा आणखी एक उपक्रम असून, स्थानकावरील सुविधा उन्नत करण्यासाठी आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांशी तो सुसंगत आहे.
या रिलॅक्स झोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या असून आरामदायी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.