Commercial Gas Shortage Pudhari
रायगड

Commercial LPG Cylinder Shortage: आखाती युद्धाचा परिणाम महाडमध्ये; व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्याने केटरर्स अडचणीत

लग्नसराईच्या हंगामात संकट; महाड-पोलादपूरमधील हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

महाड : आखाती युद्धाचे परिणाम काही अंशी महाड पोलादपूरमध्ये दिसून येऊ लागले असून शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल व्यवसायिक धारकांसाठी असलेले व्यावसायिक सिलेंडर बाजारपेठेतून बंद झाल्याने महाड पोलादपूरमधील केटरर्स व्यवसाय अडचणीत आला असल्याची माहिती या संघटनेच्या वतीने प्रसिद्धीला देण्यात आली आहे.

यासंदर्भात केटरर्स व्यवसाय धारक नंदकुमार सातपुते यांच्याशी यासदर्भात केलेल्या चर्चेमध्ये त्यांनी शासनाने तीन दिवसां पूर्वी व्यावसायिक सिलेंडर बंद केल्याने लग्न सराईच्या हंगामामध्ये केटर्स व्यवसाय धारकांवर मोठा परिणाम होऊन हा व्यवसाय अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली.

केवळ महाड शहरात 25 पेक्षा जास्त केटरर्स असून तालुक्यात ही संख्या 100 च्या वर जाते यामुळे महाडमध्ये व्यवसाय करीत असलेल्यांकडे अवलंबून असलेल्या 1000 पेक्षा जास्त कुटुंबांना याचा थेट फटका बसणार असल्याची माहिती सातपुते यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

शासनाने हॉटेल व्यवसाय धारकांसाठी व्यावसायिक सिलेंडरची वेळ सक्ती यापूर्वीच केली आहे व घरगुती सिलेंडर वापरल्याचे आढळून आल्यास त्यांच्या विरोधात खात्यामार्फत कारवाई देखील आजवर अनेक वेळा करण्यात आली आहे. हे लक्षात घेता सध्या शिल्लक असलेला सिलेंडरचा साठा संपल्यानंतर या व्यवसाय धारकांसमोर उपासमारीचे मोठे संकट उभे राहणार आहे.

चौकट या संदर्भात महाडमधील गॅस एजन्सी चे मालक संकेत वारंगे व सौरभ वारंगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शासकीय निर्देशानुसार नवीन व्यावसायिक सिलेंडर देणे थांबवल्याचे मान्य करून सध्या शिल्लक असलेला साठा हा काही दिवसातच संपेल हे स्पष्ट केले.

खेडेगावातून या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या सुमारे 1000 पेक्षा जास्त कुटुंबांना याचा थेट आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याने शासनाने या संदर्भात संबंधित व्यवसाय धारकांना व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत पर्यायी सोय म्हणून घरगुती सिलेंडर वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT