खोपोली ः चिलठण गावच्या वन विभागाच्या जागते वनातील पेट्रोल कटर मशिनने झाडे तोडुन त्यांचे ओंडके तयार करुन खैर ओंडके मारुती सुझुकी इको वाहनात भरत असताना कारवाई केली आहे. यावेळी मोबाईल, मोटोरोला कंपनीचा किपॅड मोबाईलसह एकूण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने वन विभागाच्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.
वनपरिक्षेत्र खालापूर अंतर्गत परिमंडळ चिलठण, येथील राखीव वन के. नं. 467 मधील खैर मौल्यवान प्रजातीची वृक्षतोड करुन तस्करी होणार असल्याची पक्की खबर प्राप्त झाली होती.त्यानुसार वनविभागाने सापळा रचत मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. राखीव वनातील पेट्रोल कटर मशिनने झाडे तोडुन त्यांचे ओंडके तयार करुन खैर ओंडके गाडीत भरत असताना वन कर्मचारी, अधिकारी यांनी कारवाई करीत वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, वनपाल चिलठण संजय पगारे, वनपाल खोपोली भगवान दळवी, वनपाल खालापूर नितीन कांबळे, वनपाल निगडोली पांडुरंग गायकवाड, वनरक्षक अंकुश केंद्रे, सागर टोकरेकोळी, प्रथमेश देवरे, वनरक्षक कैलास कांबळे आदींनी केली आहे.
कारवाईतील वाहनामध्ये खैर नग 40 इतके मिळून आले आहेतय सदरील वाहन तपासणी केली असता त्यात लोखंडी रॉड, लाकडी दांडके तसेच मसाला मिरचीपूड मिळुन आले. त्यातील काही मसाला वापरलेला दिसुन आला. यातील आरोपी आंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असुन आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत. पुढील तपास उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, सहा. वनसंरक्षक, पनवेल सागर माळी यांच्या मार्गदर्शनात चालु आहे.