Raigad Crime : बालपणीच्या मित्रानेच अकरा जणांना ५० लाखांस गंडवले file photo
रायगड

Raigad Crime : बालपणीच्या मित्रानेच अकरा जणांना ५० लाखांस गंडवले

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा ५ ते ७ टक्के आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : मैत्री आणि विश्वास या दोन शब्दांचा गैरफायदा घेत एका तरुणाने आपल्याच बालपणीच्या मित्रासह १० जणांना तब्बल ४९ लाख ५४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा ५ ते ७ टक्के आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी सागर रंगनाथ साळुंखे याच्याविरुद्ध फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार अभिजीत जाधव आणि आरोपी सागर साळुंखे हे दोघेही बालपणीचे मित्र असून दोघेही खारघरमध्ये राहण्यास आहेत. कोबिड काळानंतर सागरने पुण्यात जाऊन शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने २०२२ मध्ये खारघरमध्ये परत येऊन इन्व्हेस्ट फॉर फ्युचर नावाची कंपनी स्थापन केली होती. तसेच या कंपनीचे कार्यालय उत्सव चौकातील एका इमारतीत थाटले होते.

त्यानंतर सागरने आपल्या मित्रांना त्याचे शेअर मार्केटमधील प्रोफाईल आणि मिळत असलेला नफा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला, तसंच शेअर मार्केटमधील त्याच्या स्किममध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा ५ ते ७ टक्के परतावा देण्याचे तसेच १२ महिन्यांनंतर मुद्दल सुरक्षित परत देण्याचे आमिष दाखवले. मात्र तसे काही घडले नाही. त्याच्या ओळखीतील इतर १० जणांची ही देखील फसवणूक केल्याचे त्याला समजले आणि त्याने तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT