Central Railway Revenue Pudhari
रायगड

Central Railway Revenue: मुंबई विभागाने मिळविला 570 कोटींचा महसूल; मध्य रेल्वेची एप्रिल 2026 मध्ये दमदार कामगिरी

आठ टक्क्याने वाढ

पुढारी वृत्तसेवा

रोहे: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल 2026 मध्ये दमदार महसूल कामगिरी नोंदवली असून, एप्रिल 2025 मधील 528.17 कोटी रुपयांच्या तुलनेत एकूण 570.42 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, जे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 8 टक्क्याने वाढ आहे.

एप्रिल 2026 मधील एकूण कोचिंग महसूल एप्रिल 2025 मधील 320.60 कोटी रुपयांच्या तुलनेत 10.12% वाढून 353.06 कोटी रुपये झाला आहे. इतर कोचिंग महसुलात 41.26% ची उल्लेखनीय वाढ दिसून आली असून, तो मागील वर्षीच्या 35.63 कोटी रुपयांवरून 50.33 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लक्षणीय परिणाम दिसून आले असून, एप्रिल 2025 मधील 6.07 कोटी रुपयांच्या तुलनेत तिकीट तपासणीतून मिळणारा महसूल 165.89% नी वाढून 16.13 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

भाडे-व्यतिरिक्त महसुलाच्या आघाडीवर, मुंबई विभागाने एप्रिल 2026 मध्ये एकूण 13.44 कोटी रुपयांचा किरकोळ महसूल नोंदवला, जो एप्रिल 2025 मध्ये मिळवलेल्या 11.62 कोटी रुपयांपेक्षा 15.63% जास्त आहे.

विशेषतः, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मदतीने, भाडे-व्यतिरिक्त महसूल एप्रिल 2025 मधील 7.76 कोटी रुपयांवरून 32.38% वाढून 10.27 कोटी रुपयांवर पोहोचला. भाडे-व्यतिरिक्त महसुलाला चालना देण्यासाठी, विभागाने खालील उपाययोजना मध्ये ठाणे, पनवेल, ट्रॉम्बे आणि तारघर स्थानकांवर आउट ऑफ होम होर्डिंगचे कंत्राट, ज्यातून 5 वर्षांच्या कालावधीसाठी 3.55 कोटी रुपये मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT