महाडः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थे अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करणाऱ्या संपूर्ण राज्यभरातील समतादूत व प्रकल्प अधिकारी यांच्या दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन क्रांतीभूमी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये 19 व 20 जानेवारी रोजी करण्यात आल्याची माहिती समतादूत प्रकल्पाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी दिली.
राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा शाहू महाराज, क्रांतीससूर्य महात्मा जोतिराव फुले, सावित्री, जिजाऊ, रमाई आदी समतावादी महापुरुषांच्या समतेच्या विचाराचा प्रसार, प्रचार तसेच भारतीय राज्यघटनेतील संविधानिक मूल्यांचा प्रसार व प्रचार राज्यामध्ये करण्याचे महत्वपूर्ण काम करत असतात.
या कार्यशाळेचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तसेच बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बार्टी संस्थेचे निबंधक विशाल लोंढे, विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण उल्हास शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत दोन दिवस भरगच्च कार्यक्रम असून समतादुतांना विविध कौशल्य, ज्ञान देऊन त्यांची क्षमता वृद्धी करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात कार्यालयीन शिस्त याविषयी निबंधक विशाल लोंढे, आणि समतादुताची कार्यप्रणाली व भविष्यातील दिशा याविषयी विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड हे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. विकास आवटे, मुंबई, डॉ. दत्ता कोहीनकर, प्रसिद्ध व्याख्याते पुणे, संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड, पुणे हे या कार्यशाळेला संबोधित करतील.
या कार्यशाळेमध्ये एआय या प्रणालीचा वापर समता दुतांच्या कामकाजामध्ये कसा करावा, याबाबत सुनील पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. समताधदुतांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन ॲपचे उद्घाटनही या कार्यशाळेत होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थे अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करणाऱ्या संपूर्ण राज्यभरातील समतादूत व प्रकल्प अधिकारी यांच्या दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन क्रांतीभूमी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये 19 व 20 जानेवारी रोजी करण्यात आल्याची माहिती समतादूत प्रकल्पाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी दिली.