खोपोली : डोलवलीतील झोराबियन चिक्स कंपनीत चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेअसून,चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान खालापूर पोलिसांसमोरउभे ठाकले आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास खोपोली - कर्जत मार्गावरील डोलवली नजीक असणाऱ्या झोराबियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जवळपास 10 अज्ञात चोरट्यानी शिरकाव करत सुरक्षा रक्षकाला एका बंद खोलीत डांबून कंपनीच्या मुख्य ऑफिसचे लॉक तोडून आता प्रवेश केला. आतमधील साहित्याची तोडफोड करत कॅमेराचे डीव्हीआर आणि रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. हे सर्ऱ्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
यातील एक चोरटा पोलीस गणवेशात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा दिसून आले आहे.घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तसेच श्वान पथकाच्या माध्यमातूनशोध घेण्यात आला.तालुक्यात घडत असलेल्या चोरींच्या वाढत्या घटनांनी सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माणझालेले आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. चोरट्यांना शोधणे खालापूर पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. पुढील अधिक तपास खालापूर पोलीस करत आहेत.
यापूर्वीही तालुक्यात चोरींच्या घटना
डोलवली परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घालत चोरीच्या घटना केल्याने नागरिक चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.याप यामध्ये चोरट्यांनी 16 ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी प्रदीप हाडप यांच्या घरात चोरी करत कॅमेरासह काही रोकड लंपास केली होती. त्यानंतर 28 सप्टेंबरच्या रात्री सुमारास चोरट्यांनी तीन घरात कोणी नसताना या संधीचा फायदा घेत तीन घरांची घरफोडी केली .
यामध्ये चोरट्यांनी जावेद खान यांच्या घरातील जवळपास 20 तोळे सोना व अडीच लाखाची रोकड लंपास केल्याने या चोरीतील चोरटे शोधणे पोलिसांपुढे आव्हान बनले असताना पुन्हा एकदा चोरट्याने 15 ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास याच परिसरातील कंपनीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.