Alibag Accident Pudhari
रायगड

Alibag Accident: अलिबागमधील दाम्प्त्यावर काळाचा घाला; एकविरा दर्शनाहून परतताना दुचाकी अपघातात मृत्यू

सायमाळजवळ धनगरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर पती-पत्नीचे मृतदेह आढळले; अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत गोपाळे

खोपोली: आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन स्कुटीने अलिबागच्या दिशेने घरी परतणाऱ्या प्रशांत रवींद्र तांडेल 36)23) यांचा बोरघाट परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सायमाळजवळ धनगरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर दोघांचे मृतदेह आढळून आले. तांडेल दाम्प्त्य साखरआक्षी गावातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तांडेल हे पत्नीसह 20 ऑक्टोबर रोजी एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते स्कुटीने पेणमार्गे अलिबाग येथील आपल्या घरी परतत होते.

मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता शिंग्रोबा मंदिर ते सायमाळ, खोपोलीदरम्यान दिसून आले. या माहितीच्या आधारे संबंधित परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

22 ऑक्टोबर रोजी शोध मोहीमेदरम्यान सायमाळजवळ धनगरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रशांत तांडेल आणि त्यांच्या पत्नी असे दोघांचे मृतदेह आढळून आले. तसेच घटनास्थळी त्यांची स्कुटी अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली. तर घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस आणि तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT