Mahad MIDC industrial safety: महाड MIDC मधील अपघातांची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; सर्व कंपन्यांची तातडीने तपासणी

अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांच्या 'डिश' यंत्रणेला सूचना; प्रत्येक महिन्याला उपाययोजनांचा घेणार आढावा
Mahad MIDC industrial safety
Mahad MIDC industrial safetyPudhari
Published on: 
Updated on: 

श्रीकृष्ण बाळ

महाड: मागील चार महिन्यांत महाड वसाहतीमधील काही कंपन्यांमध्ये अपघात झाले आहेत. यात जीवित व वित्त हानी झाली आहे. औद्योगिक पट्ट्यात सातत्याने होणाऱ्या अपघांतामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी महाड प्रांताधिकाऱ्यांनी औद्योगिक सुरक्षा उपसंचालक आणि आरोग्य विभागाला महाड एमआयडीसीतील कंपन्यांची तपासणी करण्याच्या सूचना केली आहे.

Mahad MIDC industrial safety
Raigad Heatstroke Prevention: रायगडमध्ये उष्माघाताचा धोका; आता ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत AC कक्ष उभारणार

अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी महाड वसाहतीमधील सर्व कंपन्यांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश शासनाच्या औद्योगिक सुरक्षा उपसंचालक आणि आरोग्य विभागाला (डिश) यंत्रणेला दिले आहेत.

स्थानिक आपत्ती आरिष्ट समूहाची बैठक प्रत्येक महिन्याला घेण्याचे निर्देश कारखाना निरीक्षकांना आज तातडीने बोलविलेल्या बैठकीत दिल्याने महाड वसाहतीमधील कामगार वर्गासह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून स्थानिक आपत्ती वरिष्ठ समूहाची बैठक होऊ शकली नव्हती. गुरुवारी सकाळी बारा वाजता प्रांताधिकारी कार्यालयात या बैठकीच्या दरम्यान प्रांताधिकारी ओमासे यांनी मागील चार महिन्यात झालेल्या सर्व घटनांचा लेखाजोखा कारखाना निरीक्षकांकडून मागून शासनाच्या 'डिश' यंत्रणेला महाड वसाहती मधील सर्व कारखान्यांच्या तातडीने तपासणी करण्याचे लेखी पत्र दिल्याची माहिती दिली.

तसेच या बैठकीमध्ये झालेल्या अपघातांबरोबरच कंपनी लगतच्या असलेल्या गावांमध्ये नागरिकांना अपघाताबाबत तसेच वायू गळती संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने माहिती देण्याकरता सुरू असलेली पथनाट्य सुरू ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना दिली.

Mahad MIDC industrial safety
Navi Mumbai RTO: नवी मुंबईत परराज्यातील १५ वाहनांना दंडात्मक नोटिसा; आरटीओची तपासणी मोहीम

स्थानिक पातळीवर असलेल्या मार्ग संस्थेच्या सदस्यांच्या असलेल्या विविध अडचणींवर मात करण्यासाठी पुढील बैठकीपूर्वी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष महेश पुरोहित यांनी यासंदर्भात मार्ग यंत्रणेला अपघाता वेळी कंपनीमध्ये तातडीने जाण्यासाठी विशेष ओळखपत्र प्राप्त होणे आवश्यक असल्याचे त व्यक्त केले होते. या संदर्भात बोलताना प्रांताधिकार्‍यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

उपस्थित काही प्रतिनिधी नागरिकांनी याप्रसंगी गावातील नागरिकांना तसेच कंपनीमध्ये जलसंपर्क अधिकारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती अनिवार्य करावी अशी मागणी केली. स्थानिक आपत्ती अरिष्ट समूहाची बैठक आता प्रत्येक महिन्याला घेण्याचे आदेश प्रांताधिकारी ओमासे यांनी आज दिल्याने महाड वसाहतीमधील होणाऱ्या अपघातांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे स्थानिक प्रशासनाला शक्य होणार आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात महाड औद्योगिक क्षेत्रातील सिनेर्जीया केमिकल इंडस्ट्रीजमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटाने महाडसह आसपासचा परिसर अक्षरशः हादरला होता. रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्फोट झाला होता. या दुर्घटनेत सात कामगार जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की परिसरातील ५ किलोमीटर अंतरापर्यंत भूकंपासारखे तीव्र हादरे जाणवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news