अपघातग्रस्‍त विमानामध्ये क्रू मेंबर असलेल्‍या अपर्णा महाडिक  Pudhari News Network
रायगड

Ahmedabad Plane Crash |खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी अपघातग्रस्त विमानात सिनियर क्रु-मेंबर!

मंत्री आदिती तटकरे तातडीने महाडीक कुंटूंबीयांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी दाखल

पुढारी वृत्तसेवा

रायगड: अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा अमोल महाडिक या सिनियर क्रु-मेंबर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या मुंबईत गोरेगांव येथे महाडीक यांच्या घरी पोहोचल्या असून पूढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

या विमानामध्ये एकूण 12 क्रू मेंबर्स होते यापैकी एक अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचा सख्या भाचा अमोल यांची पत्नी आहे. तसेच क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील आणि मनीषा थापा अशी इतर क्रू मेंबर्सची नावे आहेत.

दरम्‍यान अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 या विमानाचा भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्‍या काही सेकदांमध्‍ये ही दुर्घटना घडली. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने ( डीजीसीए) दिली आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने तातडीने उपाययोजना करत अपघातग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबीयांना आणि संबंधितांना माहिती देण्यासाठी एक विशेष हॉटलाइन सेवा सुरू केली आहे. 1800 5691 444 हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, या क्रमांकावर संपर्क साधून अपघाताविषयी अधिकृत माहिती तसेच प्रवाशांच्या सद्यस्थितीबद्दल अद्ययावत माहिती मिळवता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT