Bogus seed : बोगस बियाणे, खत विक्रीवर करडी नजर File Photo
रायगड

Bogus seed : बोगस बियाणे, खत विक्रीवर करडी नजर

खरीप हंगामातील विक्रीची कृषी विभाग करणार पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Agriculture Department to keep an eye on sale of bogus seeds and fertilizers

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

खरीप हंगामात रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध व्हावीत त्याचा काळाबाजार होऊ नये किंवा बोगस बियाणे, खते विकून फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पदके व तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.शिवाय शेतकर्‍यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत.

तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली असून समिती खते बियाणे व कीटकनाशकांच्या प्राप्त तक्रारीची दखल घेऊन आवश्यक कारवाई जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 8830264335 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करता येईल.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 56 हजार 10 हेक्टर क्षेत्रासाठी एकूण पाच हजार 191 क्विंटल बियाणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी 12 हजार 907 मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा सभेमध्ये शेतकर्‍यांना बांधावर खते, बियाणे वितरण मोहीम राबविन्याच्या सूचना दिल्या असल्याने चालू खरीप हंगामात कृषी विभागामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT