Asaduddin Owaisi : 'दहशतवादी तुरुंगात, पण झाला बाप! : अल्जेरियात ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात

दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या देशाचा समावेश FATF ग्रे लिस्‍ट करण्‍याची मागणी
Asaduddin Owaisi
'एआयएमआयएम' प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी.File Photo
Published on
Updated on

"भारतात दहशतवाद्याकडून होणारा नससंहार तुम्‍हाला दक्षिण आशियातील विविध भागात आशियात नरसंहार घडवायचा आहे का?," असा सवाल करत झाकीउर रहमान लखवी नावाचा एक दहशतवादी होता. तो तुरुंगात बसून एका मुलाचा पिता बनला. पाकिस्तानला (FATF च्या) ग्रे लिस्टमध्ये टाकल्यानंतर त्‍याच्‍याविरुद्ध खटला चालवला गेला. मनी लॉन्डरिंग किंवा दहशतवादासाठी आर्थिक मदत रोखण्यासाठी नियम करणार्‍या 'फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स' (FATF) संस्‍थेच्‍या ग्रे लिस्‍टमध्‍ये पाकिस्‍तानचा पुन्‍हा एकदा समावेश केला पाहिजे," अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी (दि.३१ मे) अल्जेरियामध्ये केली.

भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळ अल्जेरियात

दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळविण्यासाठी भारताने अनेक सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात खासदार निशिकांत दुबे, एस. फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, असदुद्दीन ओवेसी, सतनाम सिंग संधू, गुलाम नबी आझाद आणि माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांचा समावेश आहे. शनिवारी या शिष्‍टमंडळाने अल्जेरियामध्ये झालेल्‍या संवादानंतर माध्‍यमांसमोर बोलताना भारताची भूमिका स्‍पष्‍ट केली.

पाकिस्तान 'तकफिरीवादा'चे केंद्र

यावेळी असदुद्दीन ओवैसी म्‍हणाले की, इस्लाम कोणत्याही व्यक्तीच्या हत्येला परवानगी देत ​​नाही. दुर्दैवाने पाकिस्‍तानमध्‍ये कट्टर इस्लामी दहशतवादी संघटना आणि अल-कायदा यांच्‍यात कोणताही फरक नाही. त्‍याला धार्मिक मान्‍यता मिळत आहे;पण ती पूर्णपणे चुकीची आहे.पाकिस्तान तकफिरीवादाचे केंद्र आहे. ( स्वतःच्या धर्माच्या किंवा पंथाच्या मान्यतेनुसार न जगणाऱ्या मुस्लिमांनाही इस्लामबाह्य घोषित करणे . अशा लोकांवर हल्ला करणे धार्मिकदृष्ट्या योग्य मानणे ) पाकिस्तानमधील दहशतवादी गट दाएश आणि अल-कायदा यांच्यात कोणताही फरक नाही. इस्लाम कोणत्याही व्यक्तीच्या हत्येला परवानगी देत ​​नाही आणि दुर्दैवाने ती त्यांची विचारसरणी आहे, असे ओवैसी यांनी स्‍पष्‍ट केले.

विचारसरणी आणि पैसा या दाेन गोष्टींवर दहशतवाद टिकतो

विचारसरणी आणि पैसा या दोन गोष्‍टींवर दहशतवाद टिकतो. हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. दक्षिण अल्जेरियामध्येही तुम्ही हे अनुभवले आहे. येथे तुम्हाला अजूनही काही समस्या आहेत. त्या मुद्द्यावर, आम्ही एकत्र आहोत, असे स्‍पष्‍ट करत जागतिक शांततेच्‍या हितासाठी दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्‍तानवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. मनी लॉन्डरिंग किंवा दहशतवादासाठी आर्थिक मदत रोखण्यासाठी नियम करणार्‍या 'फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स' (FATF) संस्‍थेच्‍या ग्रे लिस्‍टमध्‍ये या देशाचा पुन्‍हा एकदा समावेश केला पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी शनिवारी (दि.३१ मे) अल्जेरियामध्ये केली.

दहशतवादी लखवी तुरुंगात असताना एका मुलाचा बाप झाला...

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी FATF च्या ग्रे लिस्टचे महत्त्‍व अधोरेखित करताना ओवेसी म्‍हणाले की, "झाकीउर रहमान लखवी नावाचा एक दहशतवादी होता. तो तुरुंगात बसून एका मुलाचा पिता बनला. पाकिस्तानला (FATF च्या) ग्रे लिस्टमध्ये टाकल्यानंतर खटला लगेचच पुढे सरकला. दहशतवाद ही केवळ भारतासमोरील समस्‍या नाही. हा फक्त दक्षिण आशियाचा प्रश्न नाही. आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. काय होईल? तुम्हाला हे सर्व नरसंहार दक्षिण आशियाच्या विविध भागात पसरवायचे आहे का?, असा सवाल करत दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे हे जागतिक शांततेच्या हिताचे आहे. त्याला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये परत आणले पाहिजे," अशी मागणीही त्‍यांनी केली.

'दहशतवादी कारवायांना संरक्षणासाठी पाकिस्‍तानकडून अणुशक्तीचा वापर'

या वेळी भाजपचे खासदार बैजयंत पांडा म्‍हणाले की, "पाकिस्तानने आपल्या अणुशक्तीचा वापर दहशतवादी प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रास्त्र कार्यक्रमाचे संरक्षण करण्यासाठी केला आहे. तुम्ही याची माहिती इंटरनेटवर पाहू शकता. सर्वांना माहिती आहे की पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news