

Fishing ban will reduce the arrival of fresh Mhavara from Monday
उरण : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यातील दोन महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारीबंदीला सुरुवात होत आहे. या संदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 1 जून ते 31 जुलै अशा 61 दिवसांच्या कालावधीसाठी ही बंदी लागू राहील. हा कालावधी मासळीच्या प्रजननासाठी आवश्यक असल्याने ही बंदी घालण्यात येते. त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणात उपलब्म होत असल्याने मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येते. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी केल्यास बोटीवर कारवाई करण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी पंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नोकांना लागू राहील.
ही मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणार्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका 1 जून 2025 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच 31 जुलै 2025 वा त्यापूर्वी नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीस जाणार्या नौकास हे आदेश लागू राहतील.