रायगड

मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी येथे दरड कोसळली; ३ तास वाहतूक राहणार बंद

मोहन कारंडे

खोपोली; प्रशांत गोपाळे : पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर मौजे आडोशी गावचे हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळून मातीचा लगदा मुंबई बाजूच्या तिन्ही लेन वरती पडला होता. त्यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. दरड कोसळलेल्या ठिकाणी काही प्रमाणात अजूनही असलेला मातीचा मलमा आणि डोंगरावर धोकादायक अवस्थेत असणारे दगड काढण्यासाठी दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबईकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे, अशी माहिती बोरघाट पोलिसांनी दिली आहे.

कोकणात मुसळधार पाऊस असल्याने बोरघाटातून एक्सप्रेस वे वर दरड कोसळली यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. ही दरड आयआरबीचे जेसीपी, डंपरच्या सहाय्याने काढण्यात आली. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचा स्टाफ अपघातग्रस्त टीमने दरड हटविण्यासाठी मदत केली. तीन तास हे काम सुरू होते. रात्री १:४५ वाजता महामार्गारील मुंबईला जाणाऱ्या दोन लेन सुरू करण्यात आल्या. मात्र अजूनही काही मातीचा लगदा व दरड पडण्याच्या स्थितीत असल्याने आज दुपारी मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तर छोट्या वाहन व कारसाठी जुना पुणे- मुंबई महामार्ग शींग्रोबा घाटातील सुरू राहील, अशी माहिती बोरघाट सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT