मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा | पुढारी

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुलावर झालेल्या खड्ड्यांमुळे पुन्हा आज सोमवार दि.२४ जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक व्यवस्था ठप्प झाली आहे. वडगाव बुद्रुक मुठा नदी पुलापासून दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

या वाहतुक कोंडीत शालेय वाहतुक करणारी वाहने, कामगार, रुग्णवाहिका, विद्यार्थी, बसेस, मालवाहतूक करणारी वाहने चार तास या कोंडीत अडकुन पडलेली आहेत. पोलिसांचा जीव कोंडी सोडवता सोडवता मेटाकुटीला आला आहे. वाहन चालक, नागरिक सर्वच जण या कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे,आंबेगाव व सिंहगड रोड यामुळे ठप्प झालेला आहे.

Back to top button