पुणे

शिरूर : बसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

मोनिका क्षीरसागर

मांडवगण फराटा, (ता. शिरूर): पुढारी वृत्तसेवा

शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे बसच्या धडकेत बिरा सतू गोरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी गावातील मुख्य चौकात (दि. १९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्हावरा ते तांदळी दरम्यान नव्याने महामार्गाचे काम करण्यात आले आहे. या महामार्गावर शनिवारी (दि. १९) रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

घटनेची माहिती कळताच मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, गावातच मुख्य चौकात अपघात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पाहा व्‍हिडीओ : रॅपिड फायर विथ वैदेही परशुरामी

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT