पुणे

शिक्रापूर गावठाणचा विजेचा प्रश्न अखेर सुटला

अमृता चौगुले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा: कमी दाबाने वीजपुरवठ्यामुळे शिक्रापूर गावठाणातील नागरिक व व्यापारीवर्ग त्रस्त होते. अनेकवेळा आंदोलने करूनही प्रश्न सुटत नव्हता. परंतु, आमदार अशोक पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने हा प्रश्न सुटल्याचे उपसरपंच मयूर करंजे यांनी सांगितले.मागील महिन्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर या प्रश्नाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले.

जळलेला ट्रान्सफॉर्मर आ. अशोक पवार यांच्यामुळे एका दिवसात बदलून मिळाला. परंतु, त्या डीपीवर असलेल्या लोडमुळे पुन्हा डीपी जळण्याची शक्यता लक्षात घेता अजून एक अतिरिक्त डीपी बसविण्याची आवश्यकता होती. त्यामुळे महावितरणचे शिक्रापूरचे सहायक अभियंता अशोक पाटील, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांच्याशी चर्चा करून नवीन डीपीचा प्रस्ताव व अंदाजपत्रक बनवून घेतले.

केडगाव येथे जाऊन कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांना समक्ष भेटून ही डीपी बसविणे किती गरजेची आहे, हे समजून सांगितले. आमदार पवार यांना भेटून डीपीला मंजुरी मिळवली. रविवारी (दि. 19) या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, रमेश थोरात, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी मांढरे, सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल दादा सोंडे, शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT